रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जून 2022 (16:32 IST)

बस्स एकच गोष्ट खटकते, फी शाळेची

school
आपल्यास आलेला अनुभव, खूप काही शिकवतो,
शाळा अनुभवांची मनुष्यास शहाणे करतो,
बस्स एकच गोष्ट खटकते, फी शाळेची,
खूपच महागडी असते, कष्टाने असते चुकवायची,
सोप्प नसतं बरं या शाळेत अव्वल येणं,
बरंच काही लागतो आपण त्याकरीता देणं,
मग मात्र आपण सम्पन्न होतो, पुढच्या प्रवासात,
येणारा प्रसंग घासून बघतो कसोटीवर, मगच शांती आयुष्यात!!
....अश्विनी थत्ते