1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (14:43 IST)

मैत्री एक सोपी व्याख्या आहे..

Pu La Deshpande poems in marathi
मैत्री एक सोपी व्याख्या आहे..
‘रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं
असंही काहीच नाही;
पण मी तुला विसरणार नाही
ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव
असणं ही झाली मैत्री.’
शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी
बसणं महत्त्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी
माणसातलं माणूसपण जाणलं…..
अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा.
ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या…
 
- पु ल देशपांडे