पु ल देशपांडे लिखित एक सर्वोत्कृष्ट प्रार्थना अणि शुभेच्छा !

prayer
हे परमेश्वरा...
मला माझ्या वाढत्या वयाची
जाणीव दे. बडबडण्याची माझी
सवय कमी कर
आणि प्रत्येक प्रसंगी मी
बोललच पाहिजे ही माझ्यातली
अनिवार्य इच्छा कमी कर.

दुसर्‍यांना सरळ करण्याची
जबाबदारी फक्त माझीच व
त्यांच्या खाजगी प्रश्नांची
दखल घेउन ते मीच
सोडवले पाहिजेत अशी
प्रामाणिक समजूत माझी
होऊ देऊ नकोस.

टाळता येणारा फाफटपसारा
व जरुर नसलेल्या तपशिलाचा

पाल्हाळ न लावता
शक्य तितक्या लवकर मूळ
मुद्यावर येण्याची माझ्यात
सवय कर.

इतरांची दुःख व वेदना
शांतपणे ऐकण्यास मला
मदत करच पण त्यावेळी
माझ तोंड शिवल्यासारखे
बंद राहु दे. अशा प्रसंगी
माझ्याच निराशा, वैफल्यांचे
रडगाणे ऐकवण्याची माझी
सवय कमी कर.

केंव्हा तरी माझीही चूक
होउ शकते, कधीतरी माझाही
घोटाळा होऊ शकतो,

गैरसमजुत होऊ शकते
ह्याची जाणीव माझ्यात ठेव.

परमेश्वरा,
अगदी शेवटपर्यंत माझ्यात
प्रेमाचा ओलावा, गोडवा,
लाघवीपणा राहू दे.
मी संतमहात्मा नाही
हे मला माहीत आहेच,
पण एक बिलंदर बेरकी
खडूस माणूस म्हणून मी
मरू नये अशी माझी
प्रामाणिक इच्छा आहे.

विचारवंत होण्यास माझी
ना नाही पण मला लहरी
करू नकोस. दुसर्‍याला
मदत करण्याची इच्छा
आणि बुद्धी जरूर मला
दे पण गरजवंतांवर
हुकूमत गाजवण्याची

इच्छा मला देऊ नकोस.

शहाणपणाचा महान ठेवा
फक्त माझ्याकडेच आहे
अशी माझी पक्की खात्री
असूनसुद्धा, परमेश्वरा,
ज्यांच्याकडे खरा सल्ला

मागता येइल असे
मोजके का होईना

पण चार मित्र दे.

एवढीच माझी प्रार्थना...- पु.ल.देशपांडेयावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

Love Quotes in Marathi प्रेम काय आहे माहिती नाही मला...

Love Quotes in Marathi प्रेम काय आहे माहिती नाही मला...
प्रेम काय आहे माहिती नाही मला... पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर प्रत्येक जन्मी हवय मला ...

जर तुमच्या आयुष्यात अपमानाचे क्षण आले तर त्यात अडकून राग ...

जर तुमच्या आयुष्यात अपमानाचे क्षण आले तर त्यात अडकून राग करु नका नाहीतर ध्येयापासून दूर जाल
एका गावात जय जय रघुबीर समर्थ असा घोष करत एक तपस्वी महात्मा भिक्षा मागत असे. ज्यांना जग ...

झटपट तयार करा चॉकलेट पॉपकॉर्न​​​​​​​

झटपट तयार करा चॉकलेट पॉपकॉर्न​​​​​​​
कृती- डबल बॉयलरमध्ये डॉर्क आणि व्हाईट चॉकलेट स्वतंत्रपणे वितळवा. ते चांगले वितळले की ...

सहाय्यक प्राध्यापकाच्या 337 पदांसाठी भरती: आजपासून अर्ज ...

सहाय्यक प्राध्यापकाच्या 337 पदांसाठी भरती: आजपासून अर्ज करा, शेवटची तारीख 22 डिसेंबर
राजस्थान लोकसेवा आयोग वैद्यकीय शिक्षण विभागासाठी सहाय्यक प्राध्यापकाच्या 337 पदांची भरती ...

भोपळ्याच्या बिया फेकू नका, फायदे जाणून आश्चर्य वाटेल

भोपळ्याच्या बिया फेकू नका, फायदे जाणून आश्चर्य वाटेल
भोपळा खाणे जेवढे स्वादिष्ट आहे, तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. भोपळ्यामध्ये असलेले ...