सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (21:28 IST)

Planet Talent : 'प्लॅनेट मराठी'च्या 'प्लॅनेट टॅलेन्ट'मध्ये सोनपरीचा सहभाग

मराठी सिनेसृष्टीतील एक प्रतिभासंपन्न अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीतही मृणालने आपले स्वतःचे एक वेगळे  अस्तित्व निर्माण केले आहे. पदार्पणातच लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या हरहुन्नरी अभिनेत्रीने प्रत्येक भूमिकेसाठी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अनेक ऐतिहासिक भूमिकांना तिने एका वेगळ्याच उंचीवर नेले. अभिनय, लेखन यासोबतच आपल्यातील दिग्दर्शनाला वाव देत तिने दिग्दर्शकाची भूमिकाही लीलया पार पाडली. मनोरंजन क्षेत्रातील अशी टॅलेन्टेड अभिनेत्री 'प्लॅनेट मराठी'चा भाग असणाऱ्या 'प्लॅनेट टॅलेन्ट'मध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे आता मृणाल कुलकर्णी आणि 'प्लॅनेट मराठी' एकत्र आल्याने काहीतरी जबरदस्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे नक्की! 
 
'प्लॅनेट मराठी'च्या परिवाराचा भाग झाल्याबद्दल मृणाल कुलकर्णी म्हणते, ''प्लॅनेट मराठी हे मराठी प्रेक्षकांचे हक्काचे पहिलेवहिले मराठी ओटीटी आहे. सिनेसृष्टीसह प्रेक्षकांमध्येही त्याची जोरदार चर्चा आहे. 'प्लॅनेट मराठी'ने अल्पावधीतच आपल्या शाखा रुंदावल्या आहेत आणि अशा परिवारात 'प्लॅनेट मराठी'चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर यांनी मला सामावून घेतल्याबद्दल मी मनापासून आनंद व्यक्त करते. मराठीला सर्वदूर पोहोचवण्याचे अक्षय बर्दापूरकर यांचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर उत्तम काम होत आहे. 'प्लॅनेट मराठी'मुळे ते सातासमुद्रापार असलेल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याची खात्री आहे. एवढा मोठा प्लॅटफॉर्म पाठीशी असल्याने अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांना बळ मिळेल हे नक्की.''
 
मृणाल कुलकर्णीचा 'प्लॅनेट टॅलेन्ट'मध्ये सहभाग झाल्याबद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''मृणाल कुलकर्णींचा अभिनय क्षेत्रातील अनुभव फार दांडगा आहे. उत्तम कलाकाराबरोबरच ती उत्कृष्ट दिग्दर्शकही आहे. साहित्याचा वारसा लाभल्याने तिला साहित्याची उत्तम जाण आहे आणि तिच्या या गोष्टीचा फायदा 'प्लॅनेट मराठी'लाही नक्कीच होईल. अशा गुणी अभिनेत्रीचे 'प्लॅनेट टॅलेन्ट'सोबत जोडले जाणे, हा 'प्लॅनेट मराठी'चा बहुमान आहे.'' 
 
'प्लॅनेट मराठी' सोबत मृणाल कुलकर्णी प्रेक्षकांसाठी लवकरच एक खास भेट घेऊन येणार आहे. आता ती भेट काय असेल, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी कळ सोसावी लागेल.