शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2022 (16:00 IST)

अचानक कुणी हरवंत अकस्मात

marathi kavita
अचानक कुणी हरवंत अकस्मात,
सोबत असलेला कुठं गेला?कोडे पडतात!
आपलंसं , जवळच अशी व्यक्ती, मिसळतात गर्दीत,
डोळ्याआड होतात, राहतात फक्त आठवणीत,
आठवणींचे पूर डोळ्यावाटे, पण आस मनी,
काहींचे परत येतात, काही जातात निघोनी,
अशांचीच आठवण आज काढायची,
त्यांच्या सहवासाची असते गोड आठवण काढायची!!
हरवलेले गवसायला हवे आहेत,एवढं मात्र नक्की,
प्रयत्न हवेत कसोशीने, आशा अशीच करायला हवी की!
...अश्विनी थत्ते