देत चला तुम्ही जे जे आहे कमावलं!
आयुष्याच्या शाळेत एक धडा मिळतो,
तोच धडा आयुष्याचे सारे सार शिकवितो,
देता येत असेल तर काही न काही देऊन जावं,
अन्यथा जाताना तर सार लागत सोडावं,
ज्ञान असेल तर ते द्यावं,मार्गदर्शन ही करावं,
दान धर्माचा मार्ग चांगला, ते ही करता यावं,
कारण हेच अंतिम सत्य असते जीवनाचे,
रित्या हाताने येतो मनुष्य, जातांना रितेचं असते जायचे,
या मधील आयुष्य असतं आपलं,
देत चला तुम्ही जे जे आहे कमावलं!
....अश्विनी थत्ते