1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified मंगळवार, 19 जुलै 2022 (17:22 IST)

मराठी कविता : वसुंधरे तुझं रूप हे विलोभनीय

shrawan sari
वसुंधरे तुझं रूप हे विलोभनीय,
बघता आनंद मनास होतो स्वर्गीय,
नेसली तू शालू, हिरव्यागार अंगावर,
खुललं रूप तुझं ग, करतो मनास बावर,
रूप तुझें वेगळी वेगळी, काय त्यास वर्णावे,
स्वागतास श्रावणाच्या तू हीआहेस आणि काय हवे?
आसुसले तुझे ही मन, भेटण्यास अधीर,
येईल नटखट श्रावण, जरा धर धीर,
मग होईल सुरू खेळ, ऊन पावसाचा,
खरा हाच स्वभाव मनस्वी, माझ्या सख्या चा!
आला तो की फिरू आपण सवे रानोवनी,
होऊ धुंद, रंगू त्याच्याच रंगात,आंदपर्वणी!
 
....अश्विनी थत्ते