1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (08:53 IST)

खरेखुरे लिव्ह-इन

Man in love with son’s mother in law
एकजण आधी जाणार 
हे त्यालाही माहीत , तिलाही ! 
त्याला काळजी तिची ....
कधीच बँकेत नाही गेली 
कधी पोस्टात नाही गेली 
पालिकेत नाही गेली 
वीजबोर्डात नाही गेली 
विम्याच्या ऑफिसात नाही गेली 
जमेल ना तिला सगळं ? 
 
तिलाही त्याची काळजी .
उठल्या उठल्या चहा लागतो 
ती नाईस ची बिस्किटे लागतात . 
त्याशिवाय मॉर्निंग वॉक नाही .
आल्यावर नाष्टा हवा टेबलावर 
पुन्हा आंघोळीचे कपडे द्यायचे !
आता आता कुठे पॅन्ट-शर्ट सापडतात.. .
विश्रांती , दुपारचा चहा , रात्रीचे जेवण
सगळे कसे ज्या त्या वेळी हवे.
आणि कानटोपीशिवाय रात्री झोपणे नाही.
कसे जमायचे याना.... 
मी नसताना ? 
 
एके दिवस तो तिला बँकेत घेऊन जातो 
मित्रांच्या ओळखी करून देतो 
एटीएम ने कॅश काढायला लावतो.
लग्नाच्या तारखेचा पिन बनवतो.
तीही एकदा मुद्दाम आजारी पडते 
त्याला चहा करायला लावते 
खूप कौतुक करते त्याच्या चहाचे 
'मला तुमच्या हाताचे खायला खूप आवडेल हो ' 
ती त्याला सांगते , चहा बनवून घेते व 
आनंदानं पिते....एकेक घोट!
 
आता तोही तिला कुठे कुठे घेऊन जातो .
गॅस नोंद करणे , बिले भरणे 
सगळे सगळे शिकवतो .
परवा तर त्याने तिला 
मस्त डाळभात खिचडी खाऊ घातली .
किती समाधानी दिसला तिचा चेहरा !
 
तो खुश होता , ती खुश होती .
मनोमन दोघेही हाकारीत होती 
लांब लपलेल्या काळाला , 
 
' लबाडा... ,काळतोंडया..... ये ... 
आता कधीही ये ... 
आता, तू मला उचलताना ...
मी आनंदात असेन ... 
निश्चिंत असेन ...
कधीही ये ...कसाही ये .... 
तुझ्या गळामिठीचे 
मन:पूत स्वागत आहे

- Social Media