मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated :लखनऊ , बुधवार, 12 जानेवारी 2022 (12:06 IST)

असा आजचा आहे युवा,नाना कला अंगीकृत

national youth day
काहीही करून दाखवण्याचे सामर्थ्य आहे,
मनगटात ज्याच्या ताकत आहे,
देशाची आशा, ज्यामुळे आहे जागृत,
असा आजचा आहे युवा,नाना कला अंगीकृत,
काळजी नाही यत्किंचितही देशहिताची,
निधडी आहे छाती, आजच्या युवाची,
झेलून सारे घाव, करील तो देशसेवा,
आदर वाढवेल देशाचा, वाटेल इतरांना हेवा!!
विवेकानंदा स ठेवा प्रेरणास्थान,
तोच बाणा अंगिकरून,मिळवा अव्वलस्थान.
....अश्विनी थत्ते