बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 7 डिसेंबर 2020 (17:24 IST)

आपल्याच माणसांनी फसवाव, ह्यापेक्षा दुःख ते काय?

आपल्याच माणसांनी फसवाव, ह्यापेक्षा दुःख ते काय?
ओठावर असतं एक, आणि त्यांच्या पोटात असत काय?
तरी आपण ते भासवू शकत नाही उघड उघड,
आपल्याच जीवाची होते खूप परवड,
उसनं हसू ओठावर आणून, थकतात तेही,
हावभाव बदलवून बदलवून कंटाळतो चेहेराही,
असं च चालायचं का ?असा प्रश्न पडतो वरचेवर,
उत्तर सापडत च नाही, ह्या प्रश्नांवर!
उसासा दीर्घ टाकावा, व्हावे थोडे अंतर्मुख,
कशात दडून बसलंय, शोधून बघावं आपलं सुख,
कुणी नाही करत तमा,ठाऊक आहे न आपल्या स,
काळजीवाहून काय करायचे?जगायचे जसे वाटेल आपल्यास!
परत परत तेच समजवत जायचं, अन चालायचं,
ह्याला जीवन ऐसें नाव, म्हणतं राहायचं!
.....अश्विनी थत्ते.