का तरी कुणावर उगी रुसावे?
का तरी कुणावर उगी रुसावे?
ते नव्हतेच आपले, मना समजवावे,
मृगजळ कधी लागतंय का हाती?
पाठपुरावा त्याचा सगळे का करती?
शेवटी थकाव आपल्यालाच लागतं,
दूर दूर जातं आपुल्या पासून, जे आपलं नसत!
अवस्था आहे ही, जाईल ही ही निघून,
निरभ्र होईल मन, सगळं सावट जाऊन,
मग होईल हलकं हलकं,पिसा परी,
उडेल अलगद अवचित ते ही वाऱ्यावरी !
.....अश्विनी थत्ते