बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (11:28 IST)

हुशार कोल्हा

एकदा एका जंगलात एक कोल्हा आपल्या पिलांसह राहायचा. त्याचे एका सिंहाशी वैर होते. एके दिवशी कोल्हा घरी जात असताना त्याने बघितले की सिंह त्याचा पाठलाग करत आहे. तो कसाबसा आपल्या घरी पोहोचतो. सिंह थोड्या वेळ तिथेच थांबून निघून जातो. कोल्ह्याची पिले त्या सिंहाला बघतात आणि घाबरतात. 
 
एके दिवशी कोल्हा त्या सिंहाच्या घरा जवळून निघत असताना तो सिंहाला आपल्या बायकोशी बोलताना ऐकतो की सिंह कोल्ह्याचे घर तोडण्याचा विचार करत आहे. तो पळ काढत आपल्या घरी येतो आणि आपल्या पिलांना जमिनीत एक खड्डा खणायला सांगतो. बघता-बघता त्याची पिले एक मोठा खड्डा खणतात. ती मुलांना शाबासी देऊन त्यात लपून बसा असे सांगतो. तो घरातून बाहेर निघत असताना त्याला दिसत की समोरून सिंह येत आहे. तो परत घराकडे येतो आणि त्या खणलेल्या खड्ड्यात लपून बसतो आणि त्यावरून माती टाकतो. 
 
सिंह घराला पाडतो तर त्याला तिथे कोणीच सापडत नाही. तो तसाच आपल्या घरी निघून जातो. तो गेल्यावर कोल्हा आपल्या पिलांना घेऊन एका दुसऱ्या जंगलाकडे निघून जातो. अशा प्रकारे कोल्ह्याने आपल्या हुशारीने आपले आणि आपल्या पिलांचे सिंहापासून प्राण वाचवले.