शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (09:05 IST)

धनत्रयोदशीची पौराणिक कथा

एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, "तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्या वेळी तुम्हांला त्यांची दया येत नाही का?" त्यावर यमदूत म्हणाले, "एकदाच असं झालं होतं.
 
यमराजने सांगायला सुरुवात केली. एकदा हंस नावाचा राजा शिकार करताना जंगलात भरकटला. भटकत भटकत राजा दुसर्‍या राज्याच्या सीमेत निघून गेला. तेथील हेमराज नावाच्या राजाने हंस राजाचा सत्कार केला. त्यादिवशीच हेमराजाला एक पुत्र झाला. षष्ठीपूजनाच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचं भविष्य सांगितलं की, राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार, 'हा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी मरेल.' ते ऐकून राजाने मुलाला एका गुहेत लपवून ठेवलं. पण विधीलिखित अटळ असतं त्यामुळे असं काही संयोग आला की हंस राजच्या मुलीचं त्या सोळा वर्षाच्या मुलाशी लग्न झालं आणि त्याचे प्राण घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो. लग्नाच्या चौथ्या दिवशी सर्पदंशाने त्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्या वेळी तिथे झालेला विलाप ऐकून आम्ही व्यथित झालो. लग्नासारख्या अतिशय आनंदाच्या प्रसंगी हा अनर्थ कोसळलेला पाहून आम्हांला खूप वाईट वाटलं. हे ऐकल्यावर दूताने विचारले की असा प्रसंग कोणावरही येऊ नये असं आपण काही कराल, तर फार बरं होईल." यावर यमदेव म्हणाले, "धनत्रयोदशीपासून पाच दिवस जो दीपदान करील, त्याला तुमच्या इच्छेप्रमाणे अपमृत्यू येणार नाही."
 
धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
 
अन्नकूट उत्सव का साजरा करतात, खास पौराणिक माहिती जाणून घ्या. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच कार्तिक शुक्ल प्रतिपदेला अन्नकूट उत्सव साजरा केला जातो. अन्नकूट किंवा गोवर्धन पूजा भगवान श्रीकृष्णाचा अवतारानंतर द्वापारयुगापासून सुरू झालेली आहे.ब्रजवासीयांचा हा मुख्य सण आहे. या दिवशी  देऊळात विविध प्रकारचे खाद्य पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.
 
* बळी पूजा, मार्गपाळी इत्यादी सण देखील या दिवशी साजरे करतात. या दिवशी गाय -बैलांना स्नान करवून धूप-चंदनाचा आणि फुल माळा घालून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी गोमातेला मिठाई किंवा काही गोड पदार्थ खाऊ घातल्यावर तिची आरती करतात आणि प्रदक्षिणा लावतात.
 
* या दिवशी शेणाने  गोवर्धनाची आकृती बनवून त्याचा जवळ बसलेले कृष्णाच्या समोर गाय आणि ग्वालांचे गट, रोली, अक्षता, फुले, पाणी, मोली,दही आणि तेलाचा दिवा लावून पूजा आणि प्रदक्षिणा करतात.
 
कृष्णांनी ब्रजवासीयांना मुसळधार पावसापासून वाचवण्यासाठी 7 दिवसापर्यंत गोवर्धन पर्वताला आपल्या सर्वात लहान बोटावर म्हणजे करंगळीवर उचलून इंद्राचे गर्व-हरण केले आणि त्यांचा सुदर्शन चक्राच्या परिणामामुळे ब्रजवासींवर एक थेंब देखील पावसाचे पडले नाही, सर्व गोप-गोपी त्याचा सावलीत आनंदाने राहिले, तेव्हा ब्रह्माजींनी इंद्राला सांगितले की या पृथ्वीवर श्रीकृष्णाने जन्म घेतला आहे, त्याच्याशी वैर घेणं चांगले नाही. तेव्हा श्रीकृष्ण अवताराचे ऐकून इंद्रांना फार लाजिरवाणे झाले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाची माफी मागितली. भगवान श्रीकृष्णाने 7 व्या दिवशी गोवर्धन पर्वताला खाली ठेवले आणि दरवर्षी गोवर्धन पूजा करून अन्नकूट सण साजरे करण्याची आज्ञा दिली. तेव्हापासून हा सण अन्नकूट च्या नावाने साजरे केले जाऊ लागले.
 
कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी देवाच्या निमित्ते भोग आणि नैवेद्य करतात,ज्याला छप्पन भोग असे म्हणतात. अन्नकूट उत्सव साजरा केल्यानं माणसाला दीर्घायुष्य आणि आरोग्याची प्राप्ती होते तसेच दारिद्र्याचा नाश होऊन माणूस शेवट पर्यंत सुखी आणि समृद्ध राहतो.असे मानले जाते की जर का 
 
या दिवशी एखादी व्यक्ती दुखी असेल तर ती वर्षभर दुःखीच राहते म्हणून प्रत्येक माणसाला या दिवशी प्रसन्न राहून भगवान श्रीकृष्णाला प्रिय असणाऱ्या या अन्नकूटच्या सणाला भक्तीभावाने  आणि आनंदाने साजरा करावा.