सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (16:59 IST)

बोध कथा : तीन मासे

एका नदीच्या काठी त्याच नदीला लागून एक तळ होतं. ते तळ फार खोल होतं. त्या तळा मध्ये पाण्यात तीन मास्यांचे कळप राहत असे. त्यांचे नाव टुना, बकू, आणि मोलू असे होते. त्या तिघी आपसात मैत्रिणी होत्या. पण त्यांचे स्वभाव एकदम वेग-वेगळे होते. टुना समजूतदार होती. तिचा स्वभाव होता की कोणतेही संकट येण्याच्या पूर्वी ती नेहमी त्याचा मार्ग शोधून ठेवायची, बकूचे मत होते की संकट आले जरी तरी घाबरून न जाता त्यावर मार्ग काढायचा, आणि या दोघींच्या उलट मोलू असे. तिच्या मताप्रमाणे जे घडायचे आहे ते घडणारच. त्यासाठी उगाच प्रयत्न कशाला करावा. जे नशिबात लिहिले आहे ते होणारच. 
 
एके दिवसाची गोष्ट आहे त्या नदीवर संध्याकाळच्या वेळी काही मासेमार आपल्या जाळ्यात मासे घेऊन चालले होते तेवढ्या त्यांनी आकाशात मासे पकडणाऱ्या पक्षींचे कळप बघितले त्यांचा प्रत्येकाच्या तोंडात एक-एक मासा असे. त्यांनी विचार केला की बहुदा नदीच्या जवळ त्या तळात बरेच मासे असावे. असे म्हणत ते तळाजवळ येतात आणि तिथे त्या तळ्याला मास्याने भरलेले बघतात. ते म्हणतात की आता तर अंधार झाला आहे. आपण उद्या सकाळी आपले जाळं त्या तळ्यात लावून ठेवू, जेणे करून आपल्या जाळात बरेच मासे अडकतील. त्या तिघी मास्यांनी त्यांचे बोलणे ऐकून घेतले. 
 
टुना म्हणे की आता आपण त्या मासेमारांचे बोलणं ऐकलंच आहेत म्हणजे आपल्या वर उद्या संकट येणार आहे. हे कळल्यावर आता आपल्याला इथे राहायला नको. आपण आजच हे तळ सोडून जाऊ या. मी तर आजच हे तळ सोडून नदीत जातं आहे. माझ्या बरोबर तुम्ही देखील चला. बकू म्हणे तुला जायचे असेल तर तू जा अजून संकट आलेच कुठे आहे. सकाळी संकट आल्यावर बघू. असे देखील होऊ शकत की संकट येणारच नाही. मी येत नाही तू जा. त्यावर मोलू म्हणे की जर संकट यायचे असेल तर ते येणारच आणि आपल्याला त्यांचा जाळ्यात अडकायचे असेल तर आपण अडकणारचं. जे घडणार असेल ते घडेल आपण जर का त्यांचा जाळ्यात अडकून मरणार असणार तर आपण मरूच. जे घडायचे आहे ते घडणारच. म्हणून पळून गेल्यानं काहीही उपयोग नाही. टुना मासा तर तिथून आपले प्राण वाचवून निघून गेली. 
 
सकाळी मासेमारांनी आपले जाळे त्या तळात लावले ते बघून बकू तळाच्या खोल भागात एक मेलेल्या प्राण्याच्या सापळ्यात शिरून गेली पण त्या प्राण्यातून येणाऱ्या घाण वासा मुळे ती जास्त काळ त्या मध्ये थांबू शकली नाही आणि पाण्याच्या वर आली आणि जाळ्यात अडकली. मासेमाऱ्याने तिला इतर मेलेल्या मास्यां बरोबर ठेवलं. पण तिच्या अंगातून फारच कुजलेला वास येत होता, त्यामुळे मासेमाऱ्यांना वाटले की तो सडलेला मासा आहे. म्हणून त्यांनी तिला परत पाण्यात फेकून दिले अश्या प्रकारे तिने आलेल्या संकटाला तोंड देऊन आपल्या बुद्धी आणि युक्तीने आपले प्राण वाचवले. 
 
आता मोलू ती बेचारी तर नशिबावर विसंबून राहिली आणि तिने आपले प्राण वाचवले नाही आणि त्यासाठी काहीही प्रयत्न देखील केले नाही. म्हणून तिला आपले प्राण गमावले लागले.
 
शिकवण : नशीब देखील त्यांचाच साथ देतं जे कर्मावर विश्वास ठेवतात. नशिबावर अवलंबून राहणाऱ्यांचा नेहमीच नाश होतो.