गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (10:11 IST)

मनाची श्रीमंती

kids story
एकदा एका गावात एक फार गरीब माणूस राहत होता. त्याचे नाव श्रीधर असे होते. त्याच्या घरात काहीही नव्हते. तो कसं बस आपले पोट भरायचा. जरी तो गरीब होता तरी ही मनाने फार श्रीमंत होता. कधी ही कोणी त्याचा दारी आल्यावर रिते हाती जात नसे. त्याच्याकडे जे असायचे तो ते देऊन देत असे. 
 
एके दिवशी त्या गावाच्या एका श्रीमंत माणसाकडे उत्सव असतो. गावातील सर्व गावकर्‍यांना त्याने जेवायला बोलविले होते. तो पण तिथे गेला आणि बघतो तर काय त्याचा पुढे पंच पक्वानांनी भरलेले ताट होते. असं भरलेले ताट बघून त्याने विचार केले की अब्बब! एवढे भरलेले ताट या मधून तर सहजच 3 जण खातील. तो त्या माणसाची परवानगी घेऊन ते भरलेले ताट घेउन आपल्या घराकडे निघतो. वाटेत त्याला एक भिकारी दिसतो तो त्याचा कडून जेवायला मागत असतो. तो त्या अन्नामधून काहीसा भाग त्याला काढून देतो आणि आपल्या घरा कडे जातो. 
 
घरी आल्यावर तो जेवायला बसणार, की त्याचा दारी एक साधू येतो आणि तो त्याकडे अन्न मागतो. श्रीधर, त्याला देखील जेवायला देतो. आता श्रीधर कडे जेवायला काहीच शिल्लक नसतं. त्याला भूक लागलेली असते पण जेवायला काहीच नसल्यामुळे तो विचार करतो की पाणीच पिऊन घ्यावं म्हणजे भूक भागेल. असं विचार करीत तो पाणी पिण्यासाठी तांब्या घेतो, तेवढ्यातच एक म्हातारीबाई तहानलेली त्याचा दारी येते आणि पाणी पिण्यासाठी मागते. तो तिला पाणी पिण्यासाठी देतो. ती पाणी पिऊन निघून जाते. 
 
श्रीधर कडे आता खायला प्यायला काहीच नसतं. तरी ही मनातून त्याला फार आनंद आणि समाधान झालेला असतो की आज त्याने स्वतःचे तर नाही पण अजून 3 जणांची तहान भूक भागवली. असा विचार करीत तो बसलाच होता की काय बघतो की त्याच्या दारा समोर तो भिकारी, साधू आणि म्हातारी तिघे उभे आहेत. तो बाहेर येतो. तेवढ्यात बघतो की एकाएकी ते गायब होतात आणि त्याचा समोर प्रत्यक्ष देव प्रकटतात आणि म्हणतात की मी आज तुझी परीक्षा घेण्यासाठी वेग वेगळे रूप घेउन आलो होतो. तू त्या परीक्षेत पास झाला आहेस. मी तुझ्या वर फार प्रसन्न आहे. आज तू जे तुझ्या कडे होते ते सर्व काही देऊन टाकले स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा विचार नेहमीच तू करीत असतो. तुझ्याकडे मनाची श्रीमंती आहे. मी तुला वर देतो की या पुढे कधी ही तुला कसली कमी भासणार नाही. असे म्हणत देव त्याला वर देऊन निघून जातात.