गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (09:11 IST)

"मुर्खाला कधी ही उपदेश देऊ नये"

एकदा एका जंगलात माकडांचे कळप राहत असे. त्यामध्ये एक माकड फार हट्टी, बंडखोर आणि उर्मट होता. त्याला कधी कोणी काहीही चांगले शिकवायचा तर तो सांगणाऱ्यालाच बदडून काढीत असायचा. त्यामुळे त्याचा नादी कोणीही लागत नव्हते. 
 
एकदा तो खेळता खेळता जंगलाच्या बाहेर निघून गेला आणि त्याला परत येताना खूप जोराचा पाऊस लागला. कसं बस तो आपल्या झाडापर्यंत येतो आणि घर नसल्यामुळे पाउसातच भिजत बसतो. भिजल्यामुळे त्याला थंडी वाजू लागते आणि तो कुडकुडत राहतो. त्याला अश्या अवस्थेत बघून त्या झाडावर एका कोकिळेचे घरटे होते. तिनं त्याला थंडीने असे कुडकुडताना बघून तिला त्याची दया आली आणि ती कोकिळा त्याला म्हणाली की अरे आम्ही तर आपल्या चोचीने आपले घरटं बांधतो पण तुला तर देवाने हात पाय दिले आहे आणि तू तर धड धाकडं आहेस, मग तू का बर आपले घर बांधत नाही. जर तू आधीच काही हाल चाल केली असती तर आज तुझ्यावर ही पाळी आली नसती. तू दुसऱ्यांना त्रास देण्यापेक्षा स्वतः कडे लक्ष दे आणि चांगला होऊन दाखव. 
 
त्या माकडाला भिजल्यामुळे थंडी तर वाजत होतीच आणि भूक देखील लागली होती. त्यामुळे त्याला कोकिळेचे असे उपदेश देणे अजिबात आवडले नव्हते. आणि तो फार चिडला आणि त्याने त्या झाडावर चढून त्या कोकिळेचे घरटे मोडून टाकले. तिने विचार केला की अरे देवा आपण कोणा मुर्खाला उपदेश दिले त्याने आपलेच घर मोडले. असा विचार करीत ती उडून गेली. म्हणून म्हणतात की मुर्खाला कधीही उपदेश देऊ नये.