"देवं तारी त्याला कोण मारी"

akbar birbal
Last Modified सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (14:49 IST)
एकदा राजा अकबर आणि त्यांचे मंत्री बिरबल आखेटाला जाण्याचा विचार करीत असतात. तलवार काढत असताना राजा अकबरांचा अंगठा कापला जातो. ते एकाएकी कापलेला अंगठा बघून विव्हळू लागतात आणि रडायला लागतात. ते बघून बिरबल त्यांना म्हणतो की राजन वाईट वाटून घेऊ नका "जे होतं ते नेहमीच चांगल्यासाठीच होतं."

राजा मनात विचार करतो की हा असा कसा माझा हितेषी आहे माझा एवढा अंगठा कापला गेला आणि तरी हा म्हणत आहे की "जे होतं चांगल्यासाठी होतं " राजाला बिरबलाचा फार राग येतो आणि तो आपल्या शिपायांना हाक मारतो आणि त्यांना सांगतो की या बिरबलाला कारागृहात टाका. आणि मी आखेटाला जाऊन आल्यावर याला फाश्यावर द्या. असे म्हणत राजा अकबर आखेटाला निघून जातात आणि बिरबलाला कोठडीत डांबून ठेवण्यात येतं.आखेटावर गेलेला राजा घनदाट अरण्यात शिरतो. तेवढ्यातच त्याला काही रानटी लोकं बंदिस्त करतात आणि आपल्या गटाच्या प्रमुखांकडे नेतात. गटप्रमुख राजाची बळी देण्याचा निर्णय देतात. बळी देण्यासाठी राजाला नेत असतांना त्या रानटी लोकांचं लक्ष्य त्याचा कापलेल्या अंगठ्याकडे जातं. ते गट प्रमुखाला याची सूचना देतात. गट प्रमुख त्याला सोडण्याचा आदेश देतो. त्यामागील कारण असे सांगतो की बळी देण्यासाठी हा माणूस पूर्ण नाही. अर्थात ह्याचे शरीरातील अवयव संपूर्ण नाही. त्यामुळे हा बळी देण्यासाठी अपात्र आहे. असे म्हणून तो अकबराला मुक्त करून जाण्यास सांगतो. तेवढ्याच राजाला बिरबलाची गोष्ट आठवते महाराज जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्याला बिरबलाच्या फार हेवा वाटू लागतो. त्याला बिरबलाच्या बरोबर केलेल्या दुर्व्यव्हाराचे वाईट वाटू लागते.

तो वेळ न घालवता राज्यात जाऊन थेट बिरबलाकडे जातो आणि त्याची माफी मागतो,आणि घडलेलं सांगतो. त्यावर बिरबल उत्तर देतो की महाराज मी आपणांस म्हटलं होतं
की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ते तंतोतंत खरचं आहे. आणि जे आपण माझ्यासाठी केलं त्यात देखील माझ्यासाठी चांगलच होतं. ते कसे काय विचारल्यावर बिरबल म्हणतो की महाराज जर का आपण माझ्यावर रागावून मला कोठड्यात बंदिस्त केलं नसते तर कदाचित त्यावेळी त्यांनी माझी बळी दिली असती. कारण मी आपल्या बरोबर असतो. त्यावर अकबराला देखील बिरबलाच म्हणणं पटतं. ते बिरबलाचं कौतुक करतात आणि बिरबलाला मुक्त करण्यास सांगतात.


यावर अधिक वाचा :

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग ...

लीक झालेल्या डेटाविषयी मोठा खुलासा:स्वतः मार्क झुकरबर्ग व्हाट्सएप वापरत नाहीत! जाणून घ्या कोणता अॅप वापरतात ते
कोट्यवधी मोबाइल यूजर्स चॅटिंगसाठीव्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात, पण स्वतः व्हाट्सएपचा मालक ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या ...

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या स्थानावर कायम
भारताची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना, वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी व अष्टपैलू दीप्ती ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू ...

कनाडामध्ये कोरोनाने चिंता वाढवली, बऱ्याच ठिकाणी मूळ विषाणू पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे
ओटावा कॅनडामध्ये कोरोनाव्हायरसबद्दल एक नवीन चिंता निर्माण झाली आहे. आरोग्य आधिक्यांनी अशी ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण ...

आपल्या Jio नंबर वरून कॉलर ट्यून कसे काढावेत, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना विनामूल्य Jio कॉलर ट्यून प्रदान करते. प्रीपेड किंवा ...

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!

.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!
आरोग्य दिनी सांभाळा, आरोग्य स्वतःचे, रक्षण करा, रोगराई पासून घरदाराचे, समाजाचे ही ...

Corona Vaccination ‍लसीकरणाबाबद मनात शंका असलेल्या सर्व ...

Corona Vaccination ‍लसीकरणाबाबद मनात शंका असलेल्या सर्व प्रश्नांचे एक्सपर्टकडून उत्तर
साथीच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड प्रकरणात दररोज अधिक ...

टोमॅटो आरोग्यासाठी वरदान, बरेच रोग होतात बरे

टोमॅटो आरोग्यासाठी वरदान, बरेच रोग होतात बरे
टोमॅटो जग भरात सर्वाधिक वापरलं जाणारं फळं किंवा भाज्यापैकी एक आहे. भारतीय खाद्य पदार्थ ...

फॉलो करा हे 5 Tricks, अधिक काळ लिपस्टिक टिकून राहील

फॉलो करा हे 5 Tricks, अधिक काळ लिपस्टिक टिकून राहील
अनेकदा घरातून लिपस्टिक लावून आपण पर्फेट तयार होऊन बाहेर पडतो पण ज्या फंक्शनच्या ठिकाणी ...

ओळखा बघू काय ?

ओळखा बघू काय ?
१. काळा खडक, पिवळं पाणी, आत पोहते चंदाराणी = कढई, तेल, पुरी २. काळी काठी, तेल लाटी, ...

उन्हाळ्यात पुदिना (पेपरमिंट) हे 'संजीवनी औषधी वनस्पती' ...

उन्हाळ्यात पुदिना (पेपरमिंट) हे 'संजीवनी औषधी वनस्पती' पेक्षा कमी नाही, ते तुमच्या फ्रीजमध्ये आहे ना ?
उन्हाळ्यात बरीच फळे आणि खाद्यपदार्थ असतात जे पूर्णपणे नैसर्गिक असतात आणि उष्णतेवर ...