बोध कथा: उंदीर, मांजर आणि कोंबडा
एका उंदराचे इवलेसे पिल्लू होते. थोडं मोठं झाल्यावर ते पिल्लू एकदा बिळाच्या बाहेर फिरायला जातं. फिरून आल्यावर आपल्या आईला म्हणतं की आई मी आज बाहेर गेलो होतो तेव्हा मी जे बघितले ते नवलच होते आणि काहीसे विलक्षण देखील होते. ते बघून मला गम्मतच वाटली.
आश्चर्याने त्याची आई त्याला बघते आणि विचारते की बाळ असे काय बघितलेस तू ? त्यावर तो उत्तरतो की मी रस्त्याच्या कडेने फिरताना दोन अजबच प्राणी बघितले त्यापैकी एका प्राण्याच्या डोक्यावर तांबडा रंगाचा तुर्रा होता आणि तो प्राणी देखील दिसायला कसा तरी होता. गंमत सांगू आई की तो प्राणी जेव्हाजेव्हा आपली मान हलवत होता, त्याचा डोक्यावरचा तो तुर्रा देखील हलत होता. मला की नाही हे बघायलाच फार मज्जा येतं असे. पण आई त्याची आवाज इतकी कर्कश होती की त्यामुळे माझ्या जणू कानठळ्याच बसल्या.
आता दुसऱ्या प्राण्या बद्दल सांगतो ऐक..तो प्राणी दिसण्यात एकदम शांत गंभीर, असून त्याचा अंगावर जणू मउदार अशी शाल पांघरलेली होती. इतका देखणा, समजूतदार आणि शांत असा तो प्राणी होता. त्याला बघून असे वाटत होते की आपण त्याचाशी मैत्री करावी.
त्यांचे हे संवाद ऐकून त्याला त्याचा आईने समजावले आणि म्हणाली की अरे बाळ "तुला अजून काहीच कळत नाही, तू अजून फार लहान आहेस आणि काय चांगले आणि काय वाईट याची तुला अक्कलच नाही. ज्याला तू कर्कश आणि कुरूप असे समजत आहे तो अजून कोणी नसून सरळ भाबडा कोंबडा आहे. आणि एखादे वेळा आपल्याला त्याचा मांसाचे भक्षण तरी मिळू शकेल. पण दिसायला देखणा, मउदार
आणि रेशीम अंगाचा तो प्राणी फार धूर्त आणि लबाड असणारे मांजर असे. जो उंदराचे भक्षण करतो. मग त्याचाशी आपली मैत्री कशी काय शक्य आहे. बाळ म्हणून कधी ही रुपाला भुलू नये. आणि कोणावरही विश्वास ठेऊ नये.
तात्पर्य : सौंदर्यावरून अंतरंग मनाची परीक्षा घेणे अशक्य आहे.