सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (13:03 IST)

स्कंद आणि कार्तिकेय दोन्ही एकच आहेत, या संदर्भात कथा जाणून घ्या

स्कंद आणि कार्तिकेय हे दोन्ही एकच आहे. शंकर यांचा दुसरा मुलगा ज्यांना आपण कार्तिकेय म्हणून ओळखतो त्यांना सुब्रम्हण्यम, मुरुगन आणि स्कंद देखील म्हणतात. त्यांचा जन्माच्या कथेनुसार जेव्हा वडिल राजा दक्ष यांच्या यज्ञ कुंडात देवी पार्वती भस्मसात झाल्या तेव्हा भगवान शिव दुखी होऊन कठीण तपश्चर्येसाठी निघून गेले. 
 
त्यावेळी सर्व सृष्टी शक्तिहीन होते. त्या वेळेच्या संधीचा फायदा राक्षस घेतात आणि पृथ्वीवर तारकासुर नावाच्या राक्षसाची दहशत सर्वत्र पसरते.
 
देवतांना पराभवाला सामोरी जावं लागतं. सर्वत्र उच्छाद पसरतो तेव्हा सर्व देव ब्रह्माजींना विनवणी करतात. तेव्हा ब्रह्मा सांगतात की या तारकासुराचे अंत शिवाचे पुत्रच करणार. 
 
इंद्रदेव आणि इतरदेव भगवान शिवांकडे जातात, तेव्हा भगवान शिव देवी पार्वतीची आपल्या वरील असलेल्या प्रेमाची परीक्षा घेतात आणि त्यांचा तपश्चर्येला प्रसन्न होऊन शुभ वेळ आणि शुभ मुहूर्तावर देवी पार्वतीशी लग्न करतात अश्या प्रकारे कार्तिकेयाचा जन्म होतो.
 
कार्तिकेय राक्षस तारकासुराला ठार मारून देवांना त्यांचे स्थान मिळवून देतात. पुराणानुसार भगवान कार्तिकेयाचा जन्म षष्ठी तिथीला झाला होता, म्हणून या दिवशी त्यांची पूजा करण्याचे महत्व आहे. कार्तिकेय प्रख्यात देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती होते. पुराणात यांना कुमार आणि शक्ती असे म्हणून त्यांचे वर्णन केले आहे.
 
कार्तिकेयाची पूजा मुख्यतः दक्षिण भारतात होते. अरब मध्ये यजीदी जातीचे लोकं देखील त्यांची पूजा करतात, हे त्यांचे आराध्य दैवत आहे. उत्तरी ध्रुवाजवळील प्रदेशात उत्तर कुरु विशेष क्षेत्रात त्यांनी स्कंद नावाने राज्य केले. त्यांचा नावावरच स्कंद पुराण आहे. भगवान स्कंद' कुमार कार्तिकेय' या नावाने देखील ओळखले जातात.