सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (20:00 IST)

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

दर वर्षी प्रमाणे यंदाही जन्माष्टमीचा शुभ सण मथुरा-वृंदावन आणि द्वारकेत 12 ऑगस्ट रोजी आणि जगन्नाथपुरी मध्ये 11 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. भगवान श्रीकृष्ण जयंती संपूर्ण देशासाठी आनंदाने साजरी केली जाते. वैष्णव मतानुसार 12 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करणं चांगलं आहे, म्हणून मथुरा (उत्तरप्रदेश) आणि द्वारिका (गुजरात) दोन्ही ठिकाणी 12 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहे.
 
यंदाच्या वर्षी देखील कृष्ण जन्माष्टमीच्या तारखेस दोन मते होत आहेत. बऱ्याचश्या पंचांगात 11 आणि 12 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आहे, पण ऋषिकेश आणि उत्तरप्रदेशाच्या काही भागात 13 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाण्याची शक्यता आहे.
 
या मागील कारणं काय आहे -
या मागील करणं असे की कृष्ण जन्माची तारीख आणि नक्षत्र एकत्र येत नाहीत. 11 ऑगस्ट रोजी सूर्योदयानंतर अष्टमी तिथी लागणार आहे, पण ती पूर्ण दिवस आणि रात्र असणार आहे. भगवान श्रीकृष्णाचे जन्म अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात झाले असे. म्हणजे यंदाच्या वर्षी जन्माष्टमीला श्रीकृष्णाची तिथी आणि जन्म नक्षत्रचा योग जुळून येत नाहीत. यंदा 11 ऑगस्ट, मंगळवारी अष्टमी तिथी पूर्ण दिवस आणि रात्र असणार. 
 
भगवान श्रीकृष्णाचा जन्म देखील अष्टमी तिथीला मध्यरात्री झाला होता. म्हणून विद्वानांच्या म्हण्यानुसार कौटुंबिक असणाऱ्यांनी या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी करावी. त्याच वेळी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या वेळी अष्टमी तिथी असणारच, परंतु सकाळी 8 वाजे पर्यंतच असणार. म्हणून काही ठिकाणी जन्माष्टमीच्या उत्सव 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. 
 
नक्षत्राची स्थितीला बघून मथुरेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव 12 -13 ऑगस्ट रोजी रात्री साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षी हा सण भाविकांच्या शिवायच साजरा होणार आहे. या सणाला टीव्हीच्या माध्यमातून पाहता येऊ शकतं.
 
12 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीच्या दिवशी कृतिका नक्षत्र असणार. या व्यतिरिक्त या दिवशी चंद्रमा मेष रास मध्ये तर सूर्य कर्क रास मध्ये राहणार. ज्यामुळे वृद्धी योग (वाढीचा योग) असणार.
 
12 ऑगस्ट रोजी पूजेची शुभ वेळ रात्री 12 वाजून 5 मिनिटं पासून 12 वाजून 47 मिनिटं पर्यंत आहे. 
पूजेची काळावधी 43 मिनिटापर्यंत असणार. 
 
जाणून घ्या कशी करावी पूजा -
1. एका पाटावर लाल कापड घालून एका ताटलीत भगवान श्रीकृष्णाचा बाळ स्वरूप प्रतिष्ठित करावे. 
 
2. नंतर लाडू गोपाळला पंचामृताने आणि गंगेच्या पाण्याने आंघोळ घालावी. 
 
3. देवाला नवे कापडं घालावे.
 
4. आता देवाला कुंकवाचावर अक्षत लावून टीळा लावावा.
 
5. आता लाडू गोपाळाला लोणी-खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाला तुळशीचं पान द्यावे.
 
6. नैवेद्यानंतर श्रीकृष्णाला गंगाजल अर्पण करावे.
 
7 आता हात जोडून मनोमनी आपल्या आराध्य देवाचे किंवा देवीचे स्मरण करावे.