श्रीकृष्ण जन्माष्टमी: या प्रकारे करा पूजा

janmashtami
जेव्हा- जेव्हा असुरांचे अत्याचार वाढले आणि धर्माचे पतन झाले तेव्हा-तेव्हा प्रभूने पृथ्वीवर अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली आहे. अशातच श्रावणाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या मध्यरात्री अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी मथुरा मध्ये प्रभू कृष्णाने अवतार घेतला.
स्वयं प्रभू या दिवशी पृथ्वीवर अवतरीत झाले म्हणून हा दिवस कृष्ण जन्माष्टमी या रूपात साजरा केला जातो. या दिवशी स्त्री-पुरुष रात्री 12 वाजेपर्यंत व्रत ठेवतात. मंदिरांमध्ये झाक्या सजवण्यात येतात आणि देवाला पाळण्यात झोका दिला जातो. अनेक ठिकाणी दही हंडी, मटकी फोड असे आयोजन देखील होतात.

जन्माष्टमीला प्रभू श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते. तर आपण ही जाणून घ्या पूजा विधी-
1. उपवासाच्या पूर्व रात्री हलकं भोजन करावं आणि ब्रह्मचर्याचे पालन करावं.

2. उपवासाच्या दिवशी सकाळी नित्य कर्मांहून निवृत्त होऊन शुद्ध पाण्याने स्नान करावे.

3. नंतर सूर्य, सोम, यम, काळ, संधी, भूत, पवन, दिक्‌पति, भूमी, आकाश, खेचर, अमर आणि ब्रह्मादि यांना नमस्कार करून पूर्व किंवा उत्तरीकडे मुख करून बसावे.

4. यानंतर जल, फळं, कुश आणि गंध घेऊन संकल्प करावा-
ममखिलपापप्रशमनपूर्वक सर्वाभीष्ट सिद्धये
श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रतमहं करिष्ये॥

5. आता माध्यान्ह वेळात काळ्या तिळाच्या पाण्याने स्नान करून देवकीसाठी 'सूतिकागृह' नियत करावं.
6. तत्पश्चात प्रभू श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं.

7. यानंतर विधी-विधानपूर्वक पूजा करावी.

8. पूजेत देवकी, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मी या सर्वांचा नाव क्रमश: घेतलं पाहिजे.
9. नंतर या मंत्राने पुष्पांजली अर्पित करावी-
'प्रणमे देव जननी त्वया जातस्तु वामनः।
वसुदेवात तथा कृष्णो नमस्तुभ्यं नमो नमः।
सुपुत्रार्घ्यं प्रदत्तं में गृहाणेमं नमोऽस्तुते।'

10. शेवटी प्रसाद वितरण करून भजन-कीर्तन करत जागरण करावा.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

महाशिवरात्रीला आज ‘शश योग’

महाशिवरात्रीला आज ‘शश योग’
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज एक विशेष योग जुळून आला आहे. तब्बल ५९ वर्षांनतर आज ...

श्रीशिवशंकर द्वादश नामावली

श्रीशिवशंकर द्वादश नामावली
महादेवाचे अनेक मंत्र, श्लोक, स्रोत, चालीसा आणि अष्टक उपलब्ध आहेत परंतू हे महाशिवरात्रीला ...

12 ज्योतिर्लिंग ज्यात आहे महादेवाचा वास

12 ज्योतिर्लिंग ज्यात आहे महादेवाचा वास
Kashi Vishwanath काशी विश्वनाथ मंदिराला वाराणसीचं स्वर्ग मंदिर असे देखील म्हटलं जातं. ...

शिवचरित्रातून काय घ्यावे?

शिवचरित्रातून काय घ्यावे?
छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माला जवळ जवळ चारशे वर्षे होत आली तरी त्यांची कीर्ती, त्यांची ...

महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे- काय ...

महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे- काय टाळावे
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी काय ...

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात

फक्त राहुल गांधी हेच काँग्रेसला वाचवू शकतात
20- काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असे माजी ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य ...

'हाच' खरा सर्वधर्म समभाव, मठाने मु्स्लिम युवकाला मुख्य पूजारी नेमले
उत्तर कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील गदग येथे लिंगायत धर्माने धर्म परंपरेला छेद देत ...

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये

बाप्परे, चक्क साबणाची किंमत लाख रुपयांमध्ये
सामान्यपणे बाजारात १० रुपयांपासून १ हजारपर्यंतच्या किंमतीचे साबण बाजारात मिळतात. परंतु एक ...

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत
छत्रपती घराण्यातील सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती अचानक ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा
भीमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...