गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated : सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (12:42 IST)

मराठी बोध कथा : लोभी राजन

आटपाट एक नगर होतं. त्या नगरचा राजा होता इंद्रप्रस्थ. त्याचा राज्यात सर्व काही सुरळीत चालले होते. तरी ही राजाला समाधान नव्हते. त्याला फार अस्वस्थता जाणवत होती. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती तरीही त्याला अजून धन मिळावेसे वाटत होते. 
 
एके दिवशी त्याच्या दरबारात एक तपस्वी आले. राजाने त्यांची मनोभावे सेवा केली. त्याचा सेवेला प्रसन्न होऊन तो त्याला वर मागण्यास सांगतो. लोभी राजा विचारात पडतो की अशे कोणते वर मी मागू जेणे करून माझ्या संपत्तीत वाढ होईल. विचार करून तो तपस्वी कडून वर मागतो की "मी ज्या वस्तूला हात लावेन ती सोन्याची व्हावी" 
 
तपस्वी म्हणाला की राजन आपण अजून देखील ह्याचा विचार करावा. अन्यथा आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. तरी ही राजा नकार देऊन आपल्या मतावर ठाम राहतो. तपस्वी तथास्तु म्हणतो. 
 
मग काय राजा प्रत्येक ज्या वस्तूला हात लावतो ती वस्तू सोन्याची होते. त्याला हे बघून फार आनंद होतो. असे करतं करतं जेव्हा त्याला भूक लागते तो खायला जातो तर काय, ते सर्व काही अन्न सोन्याचे बनून जातं. फळे देखील सोन्याचे बनतात. अश्यामुळे त्याला काहीच खाता-पिता येत नाही तो फार दुखी होतो.
 
तेवढ्याच त्याची मुलगी त्याच्या जवळ येते तो तिला लाड करण्यासाठी जवळ घेतो तर काय, त्याची लाडाची लेक देखील चक्क सोन्याची बनून जाते. राजा फार दुखी होतो. त्याला रडू कोसळंत, त्याच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. त्याला तपस्वीचे शब्द आठवतात. पण आता पश्चाताप करून काय होणार. 
 
तात्पर्य : कोणत्याही गोष्टींचा अति लोभ नसावा.