1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
  4. Marathi Story The Existence of God

बोधकथा : भगवंताचे अस्तिव

The Existence of God
थॉमस अल्व्हा एडिसन एकदा रेल्वेने प्रवास करीत होते, त्यांच्या समोर एक मोठे प्रोफेसर बसले होते. एडिसन बायबल वाचत होते, ते प्रोफेसर नास्तिक होते त्यामुळे ते एडिसन यांना म्हणाले "अहो तुम्ही चांगल्या घरातील दिसता, वय पण 45 एक आहे मग देव देव करण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य करा आणि समाजात नाव कमवा, हे बायबल वाचून काय होणार? फेकून द्या बघू ते रेल्वे च्या बाहेर." हे ऐकून एडिसननी गपचूप बायबल आपल्या पिशवीत घातले. त्या प्रोफेसरनी आपलं कार्ड एडिसन ना दिले व सांगितले की काही काम हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. एडिसन चे स्टेशन आल्यावर ते उतरू लागले असता एडिसननी सुद्धा आपले कार्ड त्यांना दिले व ते उतरले. त्यानंतर ते प्रोफेसर सुद्धा आपल्या घरी पोचले.
 
आठवड्याचे कपडे धुवायला काढताना त्या प्रोफेसरना ते कार्ड सापडले, त्या दिवशी त्यांनी ते गडबडीत आपल्या खिश्यात टाकले होते, आज ते कार्ड बघून ते अचंबित झाले. आपण एका महान शास्त्रज्ञा समोर होतो आणि आपल्याला कळलंच नाही आणि आपण काय बोललो या बद्दल त्यांना अपराधी वाटू लागले. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा, फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
 
त्यांनी लगेचच त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली. त्यांच्या प्रयोगशाळेतच ते दोघे भेटले. ती प्रयोगशाळा पाहून प्रोफेसर थक्क झाले. ते म्हणाले "वा, काय प्रयोगशाळा आहे तुमची, खरच तुम्ही फार मोठे आहात, किती दिवस लागले हो हे सगळं करायला?" त्यावर एडिसन म्हणाले "छे हो, हे मी काहीच केलेलं नाही ,सगळे आधीच तयार होते मी फक्त इथे येऊन प्रयोग केले."
 
त्यावर प्रोफेसर म्हणाले "माझी चेष्टा करताय काय, अस आपोआप काही तयार होत होय?" त्यावर एडिसन हसले व म्हणाले "अहो ही एवढीशी माझी प्रयोगशाळा आपोआप आली अस म्हटलेलं तुम्हाला पटलं नाही ना, मग हे "ब्रह्मांड" आपोआपच निर्माण झालं हे मला कस पटेल.
 
प्रख्यात शास्त्रज्ञ एडिसन यानी एक सिद्धांत मांडला आहे, ते म्हणतात "Where there is a creation there should be a creator, Without a creator there is no creation so god exists."
 
जिथे निर्मिती असते तिच्या मागे निर्माता असतोच. निर्मात्या शिवाय निर्मिती असूच शकत नाही. म्हणजेच "देव" अस्तित्वात आहे.
 
- सोशल मीडिया
पुढील लेख
"एक विकत घ्या त्यावर एक फुकट घ्या"