मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (12:39 IST)

ज्ञानाचा भुकेला

Mahadev Govind Ranade
त्या काळात महादेव गोविंद रानडे हे हायकोर्टाचे न्यायाधीश होते. त्यांना भाषा शिकण्याची प्रचंड आवड होती. या छंदामुळे त्यांनी बर्‍याच भाषा शिकल्या; पण त्यांनी अजून बंगाली भाषा शिकली नव्हती.
 
शेवटी त्यांना एक उपाय लक्षात आला. त्यांनी एका बंगाली न्हाव्याकडून दाढी-कटिंग करवण्यास सुरुवात केली. न्हावी जोपर्यंत त्यांची दाढी-कटिंग करायचा ते त्याकडून भाषा शिकायचे. 
 
रानडे यांच्या पत्नीने यावर आपल्या पतीला म्हटले की “आपण हायकोर्टाचा न्यायाधीश आहात आणि न्हाव्याकडून भाषा शिकता! जर कुणी पाहिलं तर काय विचार करेल, आपला आदर कसा राहील! बंगाली शिकायचं असेल तर एखाद्या विद्वानाकडून शिका.
 
यावर रानडे यांनी हासत भाष्य केले की “मी तर ज्ञानाचा भुकेला आहे, माझा जातीशी काय संबंध?” हे उत्तर ऐकून बायको पुन्हा काहीच बोलली नाही.