गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 मे 2021 (14:36 IST)

तो दिवा विझता कामा नये

एका घरामध्ये पाच दिवे जळत होते. एके दिवशी पहिला दिवा म्हणाला मी इतका जळत आहे लोकांना प्रकाश देत आहे पण त्याची कोणालाही कदर नाही त्या पेक्षा मी विझून गेलेलं बर असा विचार त्याच्या मनात येतो आपले जीवन व्यर्थ आहे असे समजून तो विझून जातो. हा दिवा म्हणजे उत्साह चे प्रतीक.
 
हॆ पाहून दुसरा दिवा जो शांती चे प्रतीक असतो तो ही म्हणतो मलाही आता विझल पाहिजे. शांती आणि प्रकाश देऊन सुद्धा लोक हिंसाचार करीत आहेत, आणि शांती चा दिवाही विझून जातो. 
 
तिसरा दिवा जो हिम्मत चे प्रतीक असतो तो पण आपली हिम्मत हरवून बसतो आणि विझून जातो. उत्साह शांती आणि हिम्मत हे नसल्याने चौथा दिवा जो समृद्धी चे प्रतीक आहे तो पण विझून जाणेच उचित समजतो. 
 
पाचवा दिवा सगळ्यात लहान पण अखंड पणे जळत असतो. त्याच वेळेस एक व्यक्ती घरात प्रवेश करतो आणि पाहतो तर एकच दिवा जळत असतो. त्याला खूप आनंद होतो चारही दिवे विझले तरी एक दिवा जळत असल्याने त्याला समाधान वाटते. तो लगेच पाचवा दिवा उचलतो आणि विजलेले चारही दिवे पुनः पेटवतो. हा पाचवा दिवा म्हणजे आत्मविश्वास, उम्मीद. 
 
या करिता मनात नेहमी आत्मविश्वास ठेवा तो दिवा विझता कामा नये. हा एकच दिवा असा आहे कि तो इतर सर्व दिवे पेटवू शकतो. काही दिवसातच सर्व काही ठीक होईल, आत्मविश्वासाचा दिवा कायम जळत ठेवा. म्हणजे तो प्रकाश, शांती, समृद्धी व हिम्मत हॆ दिवे पुन्हा प्रज्वलीत करू शकतो‍.
 
-सोशल मीडिया