1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (15:28 IST)

सोबतीला असावी अशीच दिवाळी सदाही !!

poem
घरात खमंग वास दरवळायचा,
पाहुण्यांचा राबता ही असायचा,
फराळाला बोलावले जायचे अगत्याने,
एकमेकांना भेटायचे सर्व आत्मीयतेने,
अंगणात "किल्ला"बनवायचो जोशाने,
मोहरी पेरायचो त्यावर खूप हौशेने,
फटाक्यांची तर धमाल होती खूप,
रांगोळ्या अंगणात, त्याचं पल टायचं रूप,
नवीन नवीन कपडे घालून मिरवायचो,
पणत्या लावून घर दार उजळून टाकायचो,
असं वाटायचं दिवाळी सम्पूच नये कधीही,
सोबतीला असावी अशीच दिवाळी सदाही !!
...अश्विनी थत्ते