सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (19:59 IST)

दिवाळीत देवी लक्ष्मीला हे 11 नैवेद्य अर्पण करा, कधीच पैशाची कमतरता नाही भासणार

दिवाळीच्या दिवशी आई लक्ष्मीला हे नैवेद्य अर्पण केल्यास देवीची कृपा आपल्यावर नेहमीच राहणार. पण लक्षात ठेवा की आई लक्ष्मीची पूजा नेहमीच श्रीहरी विष्णू यांच्यासह करावी. 
 
लक्ष्मीला धनाची देवी मानले आहे. असे म्हणतात की पैशा नाही तर सगळं काही व्यर्थ आहे. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे आवडते नैवेद्य अर्पण करावे.
 
लक्ष्मी भोग :
1 केशरी भात किंवा दूध पोहे - पिवळ्या रंगाच्या केशरी भात देवी आईला अर्पण करून त्यांना प्रसन्न केले जाऊ शकते. आपण दूध पोह्‍याचा नैवैद्य देखील दाखवू शकतात.
 
2 पिवळ्या किंवा पांढर्‍या रंगाची मिठाई - आई लक्ष्मीला पिवळे आणि पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा गोड खाद्य दिले जातात.
 
3 खीर - आई लक्ष्मीला तांदळाच्या खिरीमध्ये किशमिश, चारोळ्या, मखाणे आणि काजू घालून अर्पित करावे.
 
4 शिरा - साजूक तुपाचा शिरा देवी आईला अत्यंत प्रिय आहे. 
 
5 ऊस - दिवाळीच्या दिवशी पूजनात ऊस ठेवण्यात येतात कारण लक्ष्मीच्या पांढऱ्या हत्तीला हे फार आवडतात.
 
6 शिगांडा - शिंगाडा आई लक्ष्मीला खूप प्रिय आहे. याची निर्मिती देखील पाण्यातून होते.
 
7 मखाणे - ज्या प्रकारे आई लक्ष्मीची उत्पत्ती सागरातून झाली आहे. त्याच प्रकारे मखाणे देखील पाण्यातून उत्पन्न झाले आहे. मखाणे कमळाच्या वनस्पतीपासून मिळतात.
 
8 बत्ताशे - बत्ताशे देखील लक्ष्मीला आवडतात. रात्रीच्या पूजेत लाह्यांसह बत्ताशे अर्पण करतात.
 
9 नारळ - नारळाला श्रीफळ देखील म्हणतात. या मध्ये शुद्ध पाणी भरलेले असते. श्रीफळ असल्याने देवी आईला हे आवडतात.
 
10 पान - आई लक्ष्मीच्या पूजेत गोड पानाचे खूप महत्त्व आहे. हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
 
11 डाळिंब - आई लक्ष्मीला फळांमध्ये डाळिंब फार आवडतात. दिवाळीच्या पूजेत डाळिंब अर्पण करा. 
 
या शिवाय पूजेच्या वेळी 16 प्रकारांची करंजी, पापडी, अनारसे, लाडू यांचे नैवेद्य दाखवावे. विनवणीत पुलहरा अर्पण करुन नंतर तांदूळ, बदाम, पिस्ते, खारीक, हळकुंड, सुपारी, गहू, नारळ, अर्पण करण्याची देखील पद्धत आहे. 
 
तसेच केवड्याचे फुले आणि आम्रबेलचा नैवेद्य अर्पण करतात. जर एखादा व्यक्तीने एक लाल फुल लक्ष्मीच्या देऊळात अर्पित करून त्यांना हे नैवेद्य दिले त्यांच्या घरात शांती आणि समृद्धी राहते आणि त्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही.