सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Modified: सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (11:50 IST)

श्राद्धात पितरांसाठी तांदळाची खीर

साहित्य: १ लिटर घट्ट सायीचे दूध, १/४ कप तांदूळ, २ टेबलस्पून सुके मेवे कप, चिमुटभर केशर, १/४ टीस्पून वेलची पूड, २ टेबलस्पून चारोळी, १/४ टीस्पून जायफळ, २०० ग्रॅम्स साखर, १ टेबलस्पून तूप
 
कृती:
तांदूळ १ तास आधी धुवून ठेवा. नंतर मिक्सरवर सरभरीत वाटून घ्या. 
१ टेबलस्पून कोमट दुधात केशर घालून ठेवा.
पातेल्यात दुध गरम करा आणि बारीक आचेवर ठेऊन जरा आटवून घ्या. दुध सतत ढवळा. नंतर वाटलेले तांदूळ दुधात घालून शिजू द्या.
एका बाजूला एका छोट्या पॅनमध्ये १ टेबलस्पून तूप गरम करुन त्यात चारोळ्या, सुके मेवे परतून घ्या.
आता दुधात साखर घालून ढवळून घेऊ. साखर घातल्यावर जरा पाणी सुटतं म्हणून अजून 8-10 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
आता त्यात सुके मेवे, जायफळ, केशर घातलेले दुध मिसळून 5 मिनिटे उकळून घ्या.
नंतर गॅस बंद करून खीर गार होईपर्यंत मध्ये मध्ये ढवळत रहा म्हणजे साय येणार नाही.
खीर कोमट किंवा थंड करुन सुद्धा चवी छान लागते.