व्यथा एका "ती" ची
गृह प्रवेश करून येते घरी "ती",
एका क्षणात विसरून जाते कोण होती ती
सुरू होत नवं जीवन,एका अनोळखी विश्वात,
नवीन नजरा तिच्या अवती भवती फिरतात,
तिला चालण्या बोलण्यातुन परखतात,
काहीतरी आपआपले अंदाज बांधू लागतात,
सगळ्या शक्तीनिशी आव्हान पेलते "ती"
कुचकट टोमण्यात, कुठंतरी
असतेच "ती"
जुनी होतं जाते, आव्हान
स्वीकारत स्वीकारत,
प्रत्येक नातं आपल्या परी
छान जोपासत,
कित्ती ही रमली तरी,
परक तिला करतात,
वेळ आली की "तिला"काही सांगू नको म्हणतात,
तरीही आलेलं प्रत्येक संकट,
तीच झेलते कुशलतेनं,
मार्ग काढत नेते संसार, आत्मीयतेनं,
समजतं नाही तिला असें का बरें होतं?
आपलंच म्हणवणाऱ कधी
आपलं का नसतं?
अश्विनी थत्ते .
नागपूर