शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

आधार

-कुसुमाग्रज

आधार
चिंब चिंब भिजतो आहे,
भिजता भिजता मातीमध्ये
ND
पुन्हा एकदा रुजतो आहे,
हिरवे कोवळे कोंब माती
माझ्याभोवती बांधते आहे
विरते पाश सरते नाते
पुन्हा पुन्हा सांधते आहे.
अहो माझे तारणहार,
जांभळे मेघ धुवांधार,

तेवढा पाऊस, माघार घ्य
आकाशातील प्रवासाला
आता तरी आधार द्या.
आधार म्हणजे निराधार......