- लाईफस्टाईल
» - मराठी साहित्य
» - मराठी कविता
चाळणी
- उषा गडकरी
जे जे समोर आलंते ते स्वीकारीत जाण्याच्या प्रवृत्तीमुळंमनाचं दालन गच्च भरून गेलंवेगवेगळ्या असंबधितआणि संदर्भहीन गोष्टींनी. वाटलं होतं, खूपच कोलाहल आणि गोंधळ होईलपरंतु मनानंच तयार केलेल्याजाळीदार चाळणीतूननेमक्या मूल्यवान गोष्टीचगाळल्या गेल्या खालीआता मनाचं तळघरसुरक्षित आहेनिवांत आहेसमृद्ध आहे.