शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

पारिजात

सौ. स्वाती दांडेकर

पारिजात
ND
दरवळतो सुगंध प्रेमाचा
पारिजात तू माझ्या जीवनाचा
तुझ्या सुगंधाने मोहीत होऊन
येते तुझ्या मागे मागे
तुझ्या रंगाने आकर्षित होऊन
रंगते मन आपुले तुझ्या सवे
तुझ्या प्रेम वृक्षाच्या सावलीत
शोधते जीवन विसावा
पारिजात तू माझा ।।1।।

श्वेत पुष्प वर्ण दर्शवितो
रंग तुझ्या निश्चल प्रेमाचा
केशरी रंग दावितो जणू
सुदृढ आधार जीवनाचा
तुझ्या रंगात शोधते
जीवन रंग जगाचा
पारिजात तू माझा ।।2।।

रंग तुझा घेऊनी
सुगंध तुझा लेऊनी
प्रेमाच्या सावलीत
रंगविते कोरा कागज जीवनाचा
पारिजात तू माझा ।।3।।