शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By डॉ. उषा गडकरी|

शरणागती

दोन ‍अधिक दोन चारच होतात
त्रिकोणाला कोन तीनच असतात
शिस्तीनं चालती आकडे, गणिताचा धाक पडे
जरासुद्धा इकडे तिकडे पाऊल न पडे

उभ्या आयुष्याचे कोडे सुटता सुटेना
म्हणून गणिताला घातले साकडे
आकडेमोड करता करता
थकून गेले बापडे

अनेकांच्या आयुष्याच्या लेखाजोख्याचे
उत्तर इतके अनपेक्षित आणि विपरीत
की शेवटी गणिताने संपूर्ण शरणागती स्वीकारून
आकडे दिले वार्‍यावर भिरकावून.