रविवार, 8 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

सघन अनुभव

सघन अनुभव साहित्य कथा कविता
जेव्हा पाऊलभर पाण्यात
चतकोर आकाशाचं प्रतिबिंब
अख्ख्या आशयाचं विश्व
उगडत नेत
तेव्हा किती पाणी
आणि किती आकाश
याचा हिशोब
ठेवू देत काही हिशोबनिसांना
तुला मला मात्र
जीवनाच्या मर्माचं झालेलं
बेहिशोबी आकलन
जेथे नेऊन सोडले
तो सघन अनुभवाचा
प्रदेश असेल, भलेही तेथे
लोकांची गर्दी अगदीच नसेल.