गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

सावट

माधुरी अशिरगडे यांची
अवघं आयुष्य आक्रसलं
कोत्या संकोचानं
देहभागाचा सोहळा बाटवला
मुक्या पारतंत्र्यानं
जगण्याची अशीच आबाळ बघत
कैक आक्रोश बसले कारावासात
बुसटलेले संस्कार नग घेऊन
बसणेच घट्ट कवटाळून हातात
अहेवपण मिरवणार्‍या दुर्दैवाचं
आमरण येणं गोत्यात
एकहाती कष्टी लिखावट
चित्रगुप्ताच्या हट्टी खात्यात
दुःखी आभाळ कोसळलं
गरत्या गर्भावर
वांझोटं सावट अख्ख्या
विश्वावर.