गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Updated : बुधवार, 12 जून 2024 (12:09 IST)

pula deshpande quotes in marathi पु. ल. देशपांडे यांचे विचार

pula deshpande
चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता ह्याच्यावर ते अवलंबून आहे, तुम्ही जर एखाद्याच मन चोरले तर त्यात वाईट काय आहे.
 
माणूस निरुत्तर झाला तरी हरकत नाही पण निष्प्रश्न झाला की संपलाच.
 
कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे. 
 
मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते.
 
सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही 
 
समाजात बेअक्कल म्हणून मानली गेलेली कामे करायला कोणी येतं नाही. फुकट तर नाहीच नाही आणि ती उपयुक्त पण बेअक्कल कामे करणाऱ्यांना आपण हीन मानतो हे तर साऱ्या सामाजिक अनास्थेचे मूळ कारण आहे.
 
क्रियापदाच मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेलं कर्म किती मोठ आहे ह्याच्यावर अवलंबून असते.
 
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे… 
 
खरं तर सगळे कागद सारखेच, फक्त त्याला अहंकार चिटकला की त्याच सर्टिफिकेट होत.
 
आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे. 
 
घड्याळाच काय अन् माणसाचं काय, आतलं तोल सांभाळणारं चाक नीट राहिलं की फार पुढे ही जाण्याची भिती नाही आणि फार मागेही पडण्याची नाही.
जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत किंवा दु:खाच्या.
 
माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण माणुस हा गेलेली केस असु नये.
 
भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील “माणस” दाखवतो, 
ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही 
आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही, 
“विचित्र” आहे पण सत्य आहे.”
 
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.
 
काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, की त्यांच्यापुढे  मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात.
 
रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो. 
 
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.