शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (16:26 IST)

अनुवादित भाषेत भाषेचा सुवास असणे गरजेचे आहे

30 सप्टेंबर रोजी, शॉपिज़नच्या बॅनरखाली जागतिक अनुवाद दिनानिमित्त, भाषिक ऐक्य आणि सांस्कृतिक सौंदर्याची विविधता आभासी कार्यक्रमाद्वारे साकार झाली. ह्या प्रसंगी ज्येष्ठ अनुवादक, साहित्यिक, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुभाष नीरव ह्यांनी आपले चाळीस वर्षांचे अनुभव अतिशय सोप्या आणि समजण्याजोग्या पद्धतीने सादर केले. अनुवादकांनी वेगवेगळ्या भाषांचे प्रतिनिधी म्हणून एकमेकांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. अनुवाद किंवा भाषांतर हे दुय्यम श्रेणीचे समजून, त्याला योग्य आदर मिळत नाही. नवीन लेखकांसाठी अनुवाद स्वीकारला पाहिजे. अनुवादाकडे शासनाकडून ही योग्य लक्ष दिले पाहिजे. अनुवादित कामात आम्हाला आमच्या स्वतःच्या भाषेचा सुगंध निर्माण करणे आवश्यक आहे. गद्यामध्ये, मुख्यतः अनुवादकाला जास्त विचार करण्याची गरज नाही, यासाठी अनुवादकाचे समर्पण आवश्यक आहे. यासह, आपण अधिकाधिक अनुवादित साहित्य वाचण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शेवटी अनुवादकांच्या अधिकारांबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला दिला जो खरोखर महत्त्वाचा होता.
 
 मुख्य अतिथी श्री संतोष अॅलेक्स जी यांनी त्यांच्या संक्षिप्त भाषणात अनुवादाशी संबंधित अनेकानेक गोष्टी सांगितल्या. आपण म्हणालात की "आज सर्व बंधने तोडून हिंदी जागतिक भाषा झाली आहे, त्यामुळे त्यात अनुवाद आणि अनुवादकाची भूमिका महत्त्वाची आहे. सामाजिक समता ही अनुवादामध्ये सर्वात मोठी अडचण आहे , कारण दोन भाषांमधील अनुवाद दोन संस्कृतींमधला अनुवादित असतो . दक्षिण भारतीय भाषांमधून हिंदीत अनुवाद करताना सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि दैनंदिन वापराच्या शब्दांची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण मशीन भाषांतरासह मानवी अनुवादाच्या चिरस्थायी गरजेबद्दल सांगितले.
 
 या चर्चेत पहिल्या क्रोएशियन कवयित्री मारिजाना जेंजिकजीचा संदेश होता, ज्यात तिने इंडोलॉजी आणि महान लेखकांच्या कामांच्या अनुवादाबद्दलचे तिचे अनुभव सांगितले.
 
 यानंतर, हर्षा गोखलेजींनी सांगितले की नवीन भाषा जाणून घेणे, समजून घेणे आणि बोलण्याचा प्रयत्न करणे हा एक नवीन अनुभव आहे, तसेच बहुभाषिक असल्याने आपल्याकडे लोकांचे लक्ष आकर्षित होते. भारतीय भाषा एवढ्या सुंदर आहेत की त्या संपूर्ण जगासारख्या आहेत. परंतु जागतिक भाषांचे त्यांचे स्वतःचे महत्त्व आहे.
 
प्रख्यात अनुवादक, वाणी सेवी, शब्द साधिका अंतराजी यांनी सांगितले की, जेव्हा भारतीय भाषांचा विचार केला जातो, तेव्हा त्याची विविधता अनुवाद क्षेत्रात त्याच्या समृद्धीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. अनुवादाद्वारे रोजगार निर्मिती शक्य आहे. ज्याप्रमाणे रोजगाराचे व्यासपीठ आहे, त्याचप्रमाणे अनुवादासाठी अनेक ऑनलाइन कार्यरत साइट्स आहेत. येथे असे लाखो लोक आहेत ज्यांना दोन किंवा तीन भाषा अवगत आहेत, ज्यांना तांत्रिक ज्ञान आणि व्यवसायिक बुद्धिमत्ता आहे, ज्याच्या आधारे ते या अनुवादाच्या कलेद्वारे आपली उपजीविका मिळवू शकतात. सध्याचे भाषांतर XTM, Manager, SDL Trudos, WordFast सारख्या सॉफ्टवेअरवर केले जाते ज्याचे तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागते. अनुवाद क्षेत्रात प्रूफ रीडिंग, पुनर्लेखन, स्थानिकीकरण, लिप्यंतरण, उपशीर्षके यासारख्या उप-संधी ही अस्तित्वात आहेत.जर आपण भाषिक सौंदर्यावर नजर टाकली तर भारतासारखी विविधता नाही आणि भाषांतर हे असे साधन आहे ज्याच्या मदतीने आपण जगाचे ते सर्व अगम्य अनुभव जाणून घेऊ शकतो जे कदाचित एकाच भाषेत जाणून घेणे शक्य नाही.
 
हे लक्षात घेण्याजोगे आहे की अंतराजीने कोविड महामारीच्या काळात जागतिक बुलेटिन आणि गाईडलाईंसचे मोफत भाषांतर करून, सर्व जाहिराती व माहिती लोकांना दिली, ज्यासाठी ह्यांना "रायटर ऑफ दि इयर" चा सन्मान देण्यात आला आहे. 
 
 डॉ वसुधा गाडगीळ यांनी आपले अनेक भाषिक अनुभव सांगितले. आपण सांगितले की भाषांतर विविध भाषांना एक सेतूरूपे कसे समृद्ध करते आणि साहित्यिक अनुवादाद्वारे आपण आपल्या संस्कृतीचा कसा प्रसार करू शकतो. याव्यतिरिक्त, आपल्या मते, अनुवादक समुदायाचे कार्य वाढायला हवे, त्यांच्यामधील एका वाढायला हवा, ह्या विचाराने आपण हा दिवस साजरा करत आहोत. जागतिकीकरणासह, औद्योगिकीकरणासह, रोजगार ह्या क्षेत्रातही अनुवादाला नवीन ओळख मिळाली आहे. जागतिक, राष्ट्रीय, प्रांतीय, प्रादेशिक भाषा, एक सेतू रूपात , दोन भाषांमधील, विविध संस्कृती, सभ्यतांची देवाणघेवाण करून सप्तरंगी इंद्रधनूसारखी आकाशात पसरत आहे.
 
 कार्यक्रमाचे सफल संचालन ऋचा दीपक कर्पे (मराठी भाषा प्रमुख - शॉपिज़न) यांनी केले, शेवटी आभार प्रदर्शन भाषा सखी अनुवाद संस्थेच्या अध्यक्षा अंतरा करवडे यांनी केले.