ज्येष्ठ लेखिका माधवी देसाई यांचे निधन
WD
माधवी देसाई यांचे संपूर्ण कुटुंबच सारस्वतांचे. माधवी देसाई या भालजी पेंढारकर आणि लीला पेंढारकर यांच्या कन्या. ज्येष्ठ साहित्यिक रणजीत देसाई हे माधवी देसाई यांचे पती. तर कवयत्री मीरा या त्यांच्या कन्या. माधवी देसाई यांचे संपूर्ण कुटुंब आयुष्यभर साहित्याच्या सेवेतच रमले. माधवी देसाई यांचे ‘नाच ग घुमा’ हे आत्मचरित्र गाजले. तसेच गोमन्त सौदामिनी हे गोव्यातील 100 कर्तबगार महिलांवर त्यांनी लिहिलेले पुस्तकही वाचकांच्या पसंतीस पडले.
माधवी देसाई यांची खास पुस्तके
असे म्हणू नकोस, भारत माझा देश आहे, धुमारे, फिरत्या चाकावरती, गोमन्त सौदामिनी, हरवलेल्या वाटा, कांचनगंगा, कथा सावलीची, किनारा, नकोशी, नियती, परिचय, प्रार्थना, सागर, सीमारेषा, शाल्मली, शुक्र चांदणी, सूर्यफुलांचा प्रदेश, स्वयंसिद्ध आम्ही, विश्वरंग, नाच ग घुमा इ.

