गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

रामभाऊंना शब्दांजली

- सुरेश तांबोळी 'धवल'

वसुंधरेच्या अंकावरती आज ठेवूनी मान
पहुडला शांत हा वाचस्पती महान!
करूनी कुरवंडी स्वप्राणांची जो धावत होता गावो-गावी
यज्ञकुंड चेतविले जयाने करूनी ज्ञानहोत्र महान!
सरस्वतीचा तो पुत्र लाडका, वैखरीचा अन स्वामी
अमृतोपम ती होती जयाची मोहक रसाळ वाणी
सोशिकतेची सात्विकतेची होती जणू ती मूर्ती
ज्ञानियांच्या रायाची अन मनी तेवती भक्ती।
देश-देव अन धर्मासाठी वाणीत होती शक्ती
जनसत्तेचे वाण सतीचे होते ज्यांच्या हाती
या युगाचे ऋषी-मुनी ते होते युगनिर्माते
मांगल्याचे दर्शन होते सदैव त्यांच्या ठायी
म्हणून मस्तक सदैव झुकते माझे त्यांच्या पायी
स्वार्थांधांच्या टीकास्त्रांचे झेलून अवघे घाव
मनी ठेवला होता त्यांनी स्थितप्रज्ञतेचा तो भाव।
रामासम या वाचस्पती तो पुनश्च होणे नाही
म्हणे 'सुर्‍या' तो आडरानीच्या झुडूपामधूनी
गाळीत आसू अगणित आणिक नयनामधूनी.