1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक

व्यक्तिविशेष : पु. ल. देशपांडे

WD
‘महाराष्ट्र भूषण’ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबईत झाला. मुंबई, सांगली, पुणे येथे शिक्षण झालेल्या पुलंनी काहीकाळ प्राध्यापकीही केली.

नाटकांतून काम करण्याचे वळण तर महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरू होते. त्याच्या जोडीला संगीत, चित्रपट, लेखन अशी क्षेत्रे लाभली आणि सुरू झाला प्रवास एका अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा! अशी सर्व क्षेत्रे काबीज केलेला आणि मराठी माणसाच्या हृदयात चिरंतन स्थान मिळविलेला हा एकमेव प्रतिभावंत. मराठी भाषा समृद्ध करणारा, मराठी विनोदाला नवी परिणामे देणारा, आपल्या बहुरूपी प्रोगांद्वारा मराठी रंगभूमीच्या क्षमता विस्तारणारा हा कलावंत. लोककलांमधला मुक्त अभिनय त्यांनी रंगभूमीवर आणला. आपले सांगीतिक संस्कृतीचे संचित नव्या पिढीला दिले. वाचकांची मनं काबीज करणारी व्यक्तिचित्रे लिहिली. आपल्या कलागुणांच बळावर मिळविलेले लाखो रुपये समाजाच्या समृद्धीसाठी त्यांनी सत्पात्री वाटले. सर्वसामान्य माणसांचे उदंड आणि निर्लेप प्रेम ज्याला लाभले, असे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व! पुणे मुक्कामी 12 जून 2000 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा