1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९

संमेलनात वारकऱ्यांविरोधात ठराव?

किरण जोशी

वादानेच सुरुवात झालेल्या महाबळेश्वर साहित्य संमेलनाचा आज समारोप होत असून, साहित्य महामंडळ आज वारकऱ्यांविरोधात ठरवा करण्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे.
साहित्य महामंडळाच्या काल झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय झाला असून, समारोपापूर्वी हा ठराव होण्याची शक्यता आहे.
संमेलनाध्यक्ष आनंद यादव यांनी वारकऱ्यांच्या विरोधाने राजीनामा दिल्याचे शल्य साहित्य महामंडळाला बोचले असून, संमेलनात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि साहित्य महामंडळाने या वादाला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दोन दिवस निर्माण केले होते.
काल झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत या संदर्भात पुन्हा पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याने आता वारकऱ्यांविरोधात हा ठराव करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा