आजचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ग्रंथोत्तेजक परीषद या नावाने प्रारंभी सुरू झाले. न्या. महादेव गोविंद रानडे यांची ही कल्पना होती. वेगवेगळ्या विषयात ग्रंथनिर्मिती करण्यार्‍यांनी एकत्र यावे, ग्रंथनिर्मितीतील अडीअडचणी व प्रश्न समजावून घ्यावेत ...
तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी नगरी- साहित्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर आनंद यादव यांच्या संदर्भात वारकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेवर आज पर्यंत चकार शब्द न काढणाऱ्या साहित्यिकांनी अखेर जनतेच्या आणि माध्यमांच्या दबावानंतर वारकऱ्यांच्या कथित समांतर सेन्सॉर ...
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरी- साहित्य संमेलनामधील 'वाद' ही नवीन बाब नाही. या ना त्या कारणाने प्रत्येक संमेलनामध्ये वाद झडतच राहतात पण, त्याचे पडसाद व्यासपीठावर उमटू नयेत याची दखल मात्र, साहित्यिकांकडून घेतली जात नाहीय. अध्यक्षपद, माजी अध्यक्ष ...
लक्षमणशास्त्री जोशी नगरी- डॉ. आनंद यादव यांच्या समर्थनार्थ समस्त साहित्यिकांनी महामंडळाविरोधात मोर्चा उघडलेला असतानाच संमेलनाच्या व्यासपीठावर मात्र डॉ. यादव यांच्या भूमिकेवर साहित्यिकांकडून अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठविली जात आहे.
महाबळेश्वर- अनेक वादांनी जरी 82 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाजले असले तरी साहित्य संमेलन भरवण्याची तळमळ असलेल्यांची संख्या मुळीच रोडावली नसून, पुणे, ठाणे, परभणी पाठोपाठ राजधानी दिल्लीनेही पुढचे साहित्य संमेलन राजधानीत भरवण्याची मागणी केली ...
महाबळेश्वर- साहित्य संमेलनाचा एक वाद संपुष्टात येत नाही तोच नवीन वाद जन्माला येत आहे. साहित्य महामंडळाच्या कामकाजाला कंटाळून आणि प्रकाशक मेहता यांच्यासह पत्रकारांना धक्काबुक्की झाल्यानंतर प्रकाशन महामंडळाने या प्रकरणी साहित्य महामंडळाला नोटीस ...
घोषणा झाल्यापासूनच वादळात अडकलेल्या महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाचा आज अध्यक्षाविनाच समारोप होत आहे. वारकऱ्यांच्या आरोपांनंतर अध्यक्ष आनंद यादव यांनी राजीनामा दिला. आता त्यांच्या भाषणाच्या प्रती समारोप कार्यक्रमात उधळण्यात येण्याची शक्यता ...
सांगलीतील संमेलनाप्रमाणेच महाबळेश्वर साहित्य संमेलनाची 'रानफूल' ही स्मरणिकाही वादाचे मूळ बनली आहे. या स्मरणिकेमध्ये आजी माजी अध्यक्षांची छायाचित्रेच गायब करून पाने कोरी ठेवण्यात आली आहेत.
किरण जोशी- वादानेच सुरुवात झालेल्या महाबळेश्वर साहित्य संमेलनाचा आज समारोप होत असून, साहित्य महामंडळ आज वारकऱ्यांविरोधात ठरवा करण्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे.
साहित्य संमेलनातील केल्या जाणार्‍या ठरावाबाबत महामंडाळची बैठक झाल्यावर पत्रकारांनी कौतिकराव ठाले-पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने संमेलनास गालबोट लागले.
किरण जोशी महाबळेश्वर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित ठेवल्यामुळे त्यांच्या भाषणाच्या प्रती देण्यात येणार नाही, असा निर्णय महामंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे संमेलनध्यक्षांचे भाषण गुलदस्तात राहणार ...
महाबळेश्वर वादाचे ग्रहण लागलेल्या साहित्य संमेलनातील वाद काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकही आज पुन्हा एक वाद जन्माला घातला गेला. या बैठकीत जाऊन डॉ. आनंद यादव यांचे भाषण देण्याची मागणी करणारे मेहता प्रकाशनाचे सुनील ...
महाबळेश्वर अध्यक्षांविना होणारे येथील मराठी साहित्य संमेलन सुरू झालं असलं तरी वाद काही संपलेले नाहीत. उलट नवनवीन वाद जन्माला घातले जात आहेत. या वादाला कंटाळून या संमेलनाला निधी पुरविणारे महाराष्ट्र शासन आता संमेलनाचे आयोजन करणारे मराठी साहित्य ...
महाबळेश्वर साहित्यिक 'यादवी' आणि मानापमानाचे प्रयोग यांनी येथील मराठी साहित्य संमेलन वादात बुडाले असताना आशाताईंच्या सुरेल स्वरयात्रेने हे वादही आज काही क्षण विसरायला लावले. साहित्याने आणि साहित्यिकांनी दिलेले देणे स्मरणरंजनातून मांडताना त्यांनी ...
लेखकांनी संतांबद्दल लिहिताना लोकश्रध्देचे भान ठेवले पाहिजे. संतांनी शिकवलेली एकात्मता हे वैश्विक जाणिवेचे अधिष्ठान असलेली एकात्मता आहे, हे ऐतिहासिक सत्य असून ते आजच्या समाजासमोर मांडताना नव्या लेखकांनी ‘अभ्यासोनी प्रगटावे’ असा सूर 'समर्थ रामदास आणि ...
महाबळेश्वर,पुरस्कारासाठी किंवा प्रसिध्दीसाठी नव्हे तर मला जे दिसले, भावले ते मी लिहित आलो. मी कायम संस्कृतीच्या विरोधात बोलतो अशी ओरड केली गेली पण, समाजातील अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी वाईट टिपले असे सांगत ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी आपली ...
महाबळेश्वर (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरी) - 'अभिजनांवर तुटून पडत बहुजनांनी साहित्य संमेलने यशस्वी केली.' 'अभिजनांची बहुजनांकडे बघण्याची मानसिकता सनातन आहे, या मानसिकतेमुळेच संमेलनांना बदलावे लागले. 'इंदिरा संतांना सुमार दर्जाच्या ...
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या कंटाळवाण्या भाषणामुळे संमेलनातील साहित्यकांच्या उत्साहावर पाणी पाडले. संमेलनात त्यांचे भाषण थांबविण्याचाही प्रयत्न झाला. परंतु त्यांनी आपली भूमिका रेटून धरली.

आनंद यादवच अध्यक्ष

शुक्रवार,मार्च 20, 2009
साहित्य संमेलानाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित ठेवण्यात आला असून अध्यक्षविनाच साहित्य संमेलनाची सुरवात झाली. परंतु संमेलनाचे अध्यक्ष डॉ.यादवच असून वारकर्‍यांच्या समाधानासाठी राजीनामा स्थगित ठेवल्याची चर्चा संमेलनात होती.
महाबळेश्वर अध्यंक्षांशिवाय पार पडत असलेल्या आणि साहित्यिकांनी आणि रसिकांनीही पाठ फिरवलेल्या मराठी साहित्य संमेलनाला एखाद्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याची कळा आलीय. अर्थात तरीही संयोजकांच्या उत्साहात मात्र कोणतीही कसूर दिसत नाहीये. म्हणूनच आजच्या ...