बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|
Last Modified: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरी, महाबळेश्वर , शुक्रवार, 20 मार्च 2009 (23:27 IST)

ठाले-पाटलांचे कंटाळवाणे भाषण

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या कंटाळवाण्या भाषणामुळे संमेलनातील साहित्यकांच्या उत्साहावर पाणी पाडले. संमेलनात त्यांचे भाषण थांबविण्याचाही प्रयत्न झाला. परंतु त्यांनी आपली भूमिका रेटून धरली.

ठाले- पाटील यांनी आपल्या भाषणात संमेलनातील वाद सांगितले. तेथूनच प्रेक्षकांची नाराजी सुरु झाली. त्यांचे भाषण अधिकच कंटाळवाणे होत असल्याने त्यांना थांबविण्याचाही प्रयत्न झाला. परंतु त्यांनी हे मनोरंजनात्मक भाषण नाही, असे सांगत पुन्हा बोलण्यास सुरवात केली.

दरम्यान संमेलनात रामदास फुटाणे यांनी अध्यक्ष नसल्याने आनंद यादवच अध्यक्ष असल्याचे सांगून त्यांच्या भाषणाच्या प्रती मिळाव्यात अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीस अनेकांनी पाठिंबा दिला. त्यानंतर डॉ.यादव यांच्या भाषणाच्या प्रती देण्याचे मान्य करण्यात आले.