बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

83 वे साहित्य संमेलन दिल्लीत?

किरण जोशी

अनेक वादांनी जरी 82 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाजले असले तरी साहित्य संमेलन भरवण्याची तळमळ असलेल्यांची संख्या मुळीच रोडावली नसून, पुणे, ठाणे, परभणी पाठोपाठ राजधानी दिल्लीनेही पुढचे साहित्य संमेलन राजधानीत भरवण्याची मागणी केली आहे.

साहित्य महामंडळाने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नसून, परप्रांतातील मराठी भाषकांची साहित्य संमेलनाबाबतची उत्सुकता पाहता हे संमेलन दिल्लीत भरवण्यास अनेक पदाधिकाऱ्यांनी संमती असल्याचे म्हटल्याने पुढील संमेलन दिल्लीत होण्याची शक्यता आहे.