सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|
Last Modified: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगर, महाबळेश्वर , शनिवार, 21 मार्च 2009 (21:52 IST)

संमेलनध्यक्षांचे भाषण गुलदस्तात राहणार

किरण जोशी
महाबळेश्वर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित ठेवल्यामुळे त्यांच्या भाषणाच्या प्रती देण्यात येणार नाही, असा निर्णय महामंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे संमेलनध्यक्षांचे भाषण गुलदस्तात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून पळ काढला.

संमेलन अध्यक्षांच्या भाषणांच्या प्रती द्यावा, असे मत महामंडळाच्या बैठकीत काही पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले होते. परंतु या विषयावर गोंधळ झाल्यावर प्रती न वाट्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती बैठकीनंतर ठाले-पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ' महामंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. परंतु या प्रती कोणाकडे आहे याची कल्पना महामंडळला नाही. प्रती देण्याची जबाबदारी स्वागत समितीचे असल्याचे सांगून त्यांनी हात झटकले.'

संमेलनाच्या स्मरणिकेत अध्यक्ष डॉ.यादव आणि मावळते अध्यक्ष प्रा. म. द. हातकणंगलेकर यांची छायाचित्र का नाही या प्रश्नावरही ते सामाधानकारक उत्तर देवू शकल नाही. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतून पळ काढला. सर्व परिस्थिती लक्षात घेवून साहित्यिक आणि प्रकाशकांनी ठाले- पाटील यांचा राजीनामा मागितला आहे.