रेड वेलवेट केक रेसिपी
साहित्य
दीड कप- मैदा
1 कप- दूध
3/4 कप- कंडेंस्ड मिल्क
दीड चमचे- विनेगर
1/4 कप- रिफाइंड ऑइल
2 चमचे- लिक्विड रेड फूड कलर
दीड चमचे- व्हॅनिला इसेन्स
2 चमचे- साखर
1/2 चमचा- बेकिंग सोडा
1 चमचा- बेकिंग पावडर
1 चमचा- शुगर पावडर
कृती
रेड वेलवेट केक बनवण्यासाठी सर्वात पाहिले ओवनला 175°C पर प्रीहीट करा. यानंतर मोठया बाउल मध्ये कंडेंस मिल्क आणि रिफाइंड ऑइल टाकून याला चांगले फेटून घ्या. क्रीमी टेक्चर आल्यानंतर यात मैदा, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि बेकिंग सोडा टाकून चांगले मिक्स करा. आता यात थोडे-थोडे दूध मिक्स करा. याला चांगले फेटा म्हणजे यात गाठी राहणार नाही. जेव्हा बेटर तयार होईल तेव्हा यात लाल रंग फूड कलर टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा. सर्वात शेवटी यात थोडया प्रमाणात सिरका टाका. केक लिक्विडला ओवन मध्ये 20 से 25 मिनिटसाठी बेक करा. केक झाल्यानंतर याला थंड करा. मग आइसिंगसाठी बटर आणि क्रिमला फेटा, मग आइसिंग शुगर आणि व्हॅनिला एक्सट्रैक्ट मिक्स करा. आता केकला तुम्ही आइसिंगच्या मदतीने तुमच्या मनाप्रमाणे सजवू शकतात.
टुटी फ्रुटी केक रेसिपी
साहित्य
मैदा - एक कप
बेकिंग पावडर - एक टीस्पून
बेकिंग सोडा - अर्धा टीस्पून
दही - अर्धा कप
कंडेन्स्ड मिल्क - अर्धा कप
तेल - १/४ कप
दूध - १/४ कप
व्हॅनिला एसेन्स - अर्धा टीस्पून
टुटी फ्रुटी - अर्धा कप
कृती-
सर्वात आधी ओव्हन १८०°C वर गरम करा. एका भांड्यात दही आणि कंडेन्स्ड मिल्क मिसळा. नंतर बटर किंवा तेल आणि व्हॅनिला एसेन्स घाला आणि फेटून घ्या. आता मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्या आणि त्यात घाला. आवश्यकतेनुसार दूध घालून एक गुळगुळीत बॅटर तयार करा. टुटी फ्रूटीला थोडे पीठ लावा आणि बॅटरमध्ये मिसळा, जेणेकरून ते स्थिर होणार नाही. ते एका ग्रीस केलेल्या टिनमध्ये ठेवा आणि ओव्हनमध्ये ३०-३५ मिनिटे बेक करा. टूथपिकने तपासा, जर ते स्वच्छ बाहेर आले तर केक तयार आहे. तर चला तयार आहे टुटी फ्रुटी केक, नक्कीच सर्व्ह करा.
चॉकलेट स्ट्रॉबेरी केक
साहित्य-
मैदा एक कप
सिल्वर बेकरी बॉल्स एक टेबलस्पून
पिठीसाखर अर्धा कप
बटर 100 ग्रॅम
स्ट्रॉबेरी दहा
साखर तीन टेबलस्पून
बेकिंग पावडर अर्धा चमचा
बेकिंग सोडा अर्धा चमचा
ड्रिंकिंग चॉकलेट एक टेबलस्पून
कोको पावडर दोन टेबलस्पून
दूध अर्धा कप
रिफाइंड ग्रीसिंगसाठी
कृती-
सर्वात आधी बटर आणि पिठीसाखर हलके आणि मऊ होईपर्यंत चांगले फेटून घ्यावे.
आता एका भांड्यात मैदा, चॉकलेट, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घाला आणि चांगले मिसळा. तसेच केक बेक करण्यासाठी, मायक्रोवेव्ह 180 अंशांवर प्रीहीट करा. आता कपकेकच्या साच्यांना ग्रीस करा, त्यात पीठ भरा आणि 180 अंश सेल्सिअसवर 25 मिनिटे बेक करावे. यानंतर 5 ते 6 स्ट्रॉबेरी चिरून घ्या आणि केक तयार होईपर्यंत ३ चमचे साखर घालून 15 मिनिटे शिजवा. साखर आणि स्ट्रॉबेरी सॉससारखे दिसेपर्यंत शिजवा. दुसऱ्या भांड्यात दोन स्ट्रिंग सिरप बनवा. उरलेल्या स्ट्रॉबेरीजचा अर्धा काप द्या आणि त्यावर सिरप लावा. केक बेक झाल्यानंतर मायक्रोवेव्हमधून बाहेर काढा आणि प्लेटवर ठेवा. केकवर स्ट्रॉबेरी सॉस लावा, केक कापून फॅन करा, चोको चिप्स आणि सिल्व्हर बॉल्स शिंपडून सजवा.
चॉकलेट केक रेसिपी
साहित्य-
एक कप- मैदा
एक कप- पिठी साखर
अर्धा कप- कोको पाउडर
अर्धा कप- गरम पाणी
अर्धा कप- थंड दूध
एक चमचा - व्हॅनिला एसेंस
दोन चमचे - दही
चिमूटभर - ईनो
एक चमचा - बेकिंग पाउडर
अर्धा कप- लोणी
कृती-
केक बनवण्यापूर्वी सर्वात आधी ओव्हन 180 अंशांवर प्री-हीट करण्यासाठी ठेवावे. तसेच केक मेकरला तुपाने ग्रीस करावे. आता एका भांड्यात मैदा, साखर, कोका पावडर, बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करावे. एका भांड्यात अर्धा कप बटर आणि अर्धा कप गरम पाणी घालावे. व पिठात चांगले फेटून घ्यावे. यानंतर दूध आणि व्हॅनिला एसेंस घालून मिक्स करा. नंतर दही आणि बाकीचे सर्व साहित्य घालावे. आता केक मेकरमध्ये ठेवा आणि 160 अंशांवर 35-40 मिनिटे बेक करावा. 40 मिनिट ठेवावे व चेक करून घ्यावे. आता केकमध्ये टूथपिक घाला, जर तो स्वच्छ बाहेर आला तर समजून घ्या की तुमचा केक तयार आहे. तुम्हाला आवडत असल्यास वरतून चॉकलेट सॉस घालू शकतात. तर चला तयार आहे आपला ख्रिसमस स्पेशल चॉकलेट केक.
ख्रिसमस फ्रूट प्लम केक रेसिपी
साहित्य-
सुके मेवे
मनुका -१/२ कप
काळ्या मनुका -१/४ कप
टूटी-फ्रूटी- १/४ कप
चेरी -१/४ कप
बदाम आणि काजू तुकडे -१/२ कप
मैदा-१ १/२ कप
ब्राउन शुगर-१ कप
बटर/लोणी-१/२ कप
अंडी-२
दूध-१/४ कप
संतऱ्याचा रस-१/४ कप
व्हॅनिला इसेन्स -१ चमचा
दालचिनी पावडर-१ चमचा
जायफळ पावडर-१/२ चमचा
बेकिंग पावडर -१ चमचा
बेकिंग सोडा-१/२ चमचा
कृती-
सर्वात आधी किमान १ तास किंवा रात्रभर संत्र्याचा रस आणि सुके मेवे भिजवून ठेवा. आता मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मसाले एकत्र चाळून घ्या. एका मोठ्या भांड्यात बटर आणि साखर फेणून घ्या. नंतर एकेक करून अंडी घाला आणि चांगले मिक्स करा. व्हॅनिला इसेन्स घाला. आता हळू हळू मैदा आणि दूधाचे मिश्रण आलटून पालटून घाला आणि मिश्रण हलक्या हाताने मिक्स करा. आता भिजवलेले सुके मेवे आणि त्यांचे उर्वरित द्रव बॅटरमध्ये मिसळा. केकच्या भांड्याला बटर लावून मैदा भुरभुरा. तयार मिश्रण भांड्यात ओता. ओव्हनमध्ये १८०°C वर ४५ ते ५० मिनिटे बेक करा. तयार केक वर लाल चेरी सजवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik