शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

सरकार साहित्य महामंडळावर बंधन घालणार

WDWD
अध्यक्षांविना होणारे येथील मराठी साहित्य संमेलन सुरू झालं असलं तरी वाद काही संपलेले नाहीत. उलट नवनवीन वाद जन्माला घातले जात आहेत. या वादाला कंटाळून या संमेलनाला निधी पुरविणारे महाराष्ट्र शासन आता संमेलनाचे आयोजन करणारे मराठी साहित्य महामंडळ व इतर संबंधित संस्थांवर काही बंधन घालण्याचा विचार करत आहे.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनौपचारिक चर्चेत ही माहिती दिली. राज्य शासन या संमेलनासाठी पन्नास लाखाचा निधी देते. त्यामुळे या संमेलनाच्या यशापयशाबाबत लोक सरकारला जाब विचारू शकतात. म्हणूनच या संमेलनात वाद होऊ नये म्हणून आम्ही या संमेलनाचे आयोजन करणार्‍या संस्थांना काही बंधने घालण्याचा विचार करू असे पाटील प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले. यावेळी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणेही उपस्थित होते.

दरम्यान, महाबळेश्वर संमेलनात उडालेल्या गोंधळाबद्दल अनेक मान्यवर साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांनी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या पदावरून जायला पाहिजे असे सांगून, सुमार बुद्धिच्या आणि साहित्यिक नसणार्‍या ठाले-पाटलांना या पदावर रहाण्याचा काहीही हक्क नाही. त्यांनीच हा सर्व गोंधळ घातल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.