बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

संमेलनाचा समारोपही वादग्रस्त?

घोषणा झाल्यापासूनच वादळात अडकलेल्या महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाचा आज अध्यक्षाविनाच समारोप होत आहे. वारकऱ्यांच्या आरोपांनंतर अध्यक्ष आनंद यादव यांनी राजीनामा दिला. आता त्यांच्या भाषणाच्या प्रती समारोप कार्यक्रमात उधळण्यात येण्याची शक्यता असल्याने साहित्य संमेलनाचा अखेरही वादळीच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वारकऱ्यांनी यादव यांच्या विरोधात बिगुल वाजवल्याने साहित्य संमेलनापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर साहित्य महामंडळाने अध्यक्षाविनाच संमेलन घेण्याचा निर्णय घेतला.

यानंतर हा साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप करत साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यादव यांचा राजीनामा साहित्य महामंडळाने मंजूर केला नसल्याने ते अजूनही अध्यक्षपदावर कायम असून, त्यांचे भाषण वाचून दाखवण्यात यावे अशी मागणी साहित्यिकांनी केली आहे.