शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

स्त्रियांचे 8 'रहस्य'

स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक समजदार, योग्य निर्णय घेणार्‍या का असतात? जाणून घ्या स्त्रियांचे ते 8 रहस्य ज्यामुळे त्या पुरुषांपेक्षा जास्त नैतिक असतात.

अधिक जगतात: स्त्रिया अधिक काळ जगतात. याचे मुख्य कारण आहे हृदयविकारांसाठी त्यांची प्रतिकारशक्ती. साधारणता: स्त्रियांना हृदयविकार 70 ते 80 च्या वयात होतो जेव्हाकी पुरुषांचे हृदय 50 ते 60 दरम्यानच दमू लागतं.
अधिक सहनशक्ती : अनेक अध्ययन हे सिद्ध करून चुकले आहेत की स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत सहन करण्याची शक्ती अधिक असते. साइकॉलजिस्ट क्लिफर्ड लजारस यांच्याप्रमाणे ती स्वत:ला प्रसव वेदनांसाठी तयार करत असते.

ताण सहन करण्यात तज्ज्ञ : वेस्टर्न ऑन्टारियो युनिव्हर्सिटी मध्ये झालेल्या संशोधनाप्रमाणे स्त्रिया ताण सहन करण्यात अधिक सक्षम असते. त्यांचा मेंदू ऑक्सिटोसिन अधिक उत्पन्न करतं. हा हार्मोन स्त्रियांना शांत राहण्यात मदत करतं.
गजब मेमरी : ब्रिटनच्या ऍस्टन युनिव्हर्सिटी मधल्या एका रिसर्चप्रमाणे स्त्रियांची मेमरी पुरुषांच्या तुलनेत अधिक स्ट्रॉंग असते. आणि वयाप्रमाणे दोघांच्या क्षमतेत अंतर वाढत जातं.

अधिक स्मार्ट : गुप्तचर तज्ज्ञ जेम्स फ्लिन यांच्याप्रमाणे युरोप, अमेरिका, कॅनडा आणि न्यूझीलंड येथील स्त्रियांनी पुरुषांना इंटेलिजेंस टेस्टमध्ये मात केले. स्त्रियांचे मेंदू जलद गतीने विकसित होत असतं.
कॉलेजमध्ये अधिक यशस्वी : जॉर्जिया आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी च्या एका स्टडीप्रमाणे स्त्रिया विज्ञान अधिक योग्यरीत्या समजू शकतात. पुरुषांची कंटाळून अभ्यास सोडण्याची शक्यता अधिक असते.

मार्ग ओळखण्यात तज्ज्ञ : प्रोफेसर डाएन हाल्पर म्हणतात की स्त्रिया निशाण आणि संकेत न और संकेत लक्षात ठेवण्यात तज्ज्ञ असतात. त्यांना रस्ते चांगलेच लक्षात राहतात. हरवलेल्या वस्तूदेखील त्या पटकन शोधून काढतात. 
पेश्याचा हिशोब : हिशोब ठेवण्यात स्त्रिया तज्ज्ञ असतात. बार्कलेज वेल्थ अँड लेडबरी रिसर्च च्या स्टडीप्रमाणे निवेश करण्यात स्त्रियांनी चांगले परिणाम दिले कारण पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन बनत ज्याने त्यांना अनावश्यक धोका पत्करण्यासाठी प्रेरणा देतं.