suvichar

Home Tips: सजावटीचा कानमंत्र

Updated: सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (12:36 IST)
लिव्हिंग रूम घरातील सर्वांच्या उठण्या बसण्याची जागा असते. आजकाल टीव्ही लिव्हिंग रूममध्ये ठेवण्याऐवजी फॅमिली रूममध्ये ठेवतात. त्यामुळे या खोलीत सर्वजण ऐसपैस बसू शकतील इतकी पुरेशी जागा असावी. घरात कोणी प्रवेश केला की त्याचं आगमन आधी लिव्हिंग रूममध्ये होतं. त्यासाठी तेथे आकर्षक रंगसंगती असायला हवी. या खोलीमध्ये ऑफ व्हाईट, यलो, क्रीम, लेमन, पिस्ता अशा रंगांना पसंती दिली जाऊ लागली आहे. तथापि, ही जागा मोठी असेल तर गडद रंग, वॉलपेपर, टाईल्स क्लाऊडिंग वापरलं जाऊ लागलं आहे. या खोलीत लावण्यात येणारे फोटो किंवा पेंटिंग्ज हसरी, खेळकर, आल्हाददायक वाटेल अशी असावीत. त्यासाठी काही थीमबेस्ड पेंटिंग्जही घेऊ शकतो.

पुढे पहा डायनिंग रूमची सजावट 
डायनिंग रूममध्ये घरातील सर्वजण एकत्र बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. त्यामुळे तेथे व्यवस्थित प्रकाश असावा. प्रकाशयोजना करताना खुच्र्यांवर बसलेल्या व्यक्तींच्या सावल्या टेबलवर पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

पुढे पहा स्वयंपाकघराची सजावट 
स्वयंपाकघर हा घरातील महत्त्वाचा भाग. याची सजावट, गृहोपयोगी वस्तूंची मांडणी हे थोडं अवघड काम असतं. येथे सर्व अत्यावश्यक गृहोपयोगी वस्तू हाताच्या टप्प्यात येतील अशा ठिकाणी असाव्यात. स्वयंपाक करताना दिल्या जाणार्‍या फोडण्यांमुळे श्‍वास घुसमटू नये यासाठी शेगडीजवळ मोठी खिडकी असावी. तसंच तेथे एक्झॉस्ट फॅन किंवा चिमणी लावणं आवश्यक आहे.

पुढे पहा बेडरूममधील सजावट 
बेडरूम हादेखील घरातील महत्त्वाचा भाग. बेडरूममध्ये फिक्कट, निळा, आकाशी किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. मुलांची बेडरूम ही खेळण्यासाठीदेखील असते. या खोलीचे दोन स्वतंत्र विभाग करावेत. त्यापैकी एक खेळण्यासाठी तर दुसरा विभाग अभ्यासाची पुस्तकं, स्टडी टेबल इत्यादीसाठी असावा. मुलांचा स्वभाव शांत असेल तर त्या खोलीला उजळ रंग लावावा. मूल चंचल स्वभावाचं असेल तर शांत आणि आल्हाददायक रंगाचा वापर करावा. मुलींच्या बेडरूमला फिकट जांभळा किंवा गुलाबी रंग वापरावा.

आपलं घर मोठय़ा आकाराचं आहे असा भास व्हावा असं वाटत असेल तर आरसा किंवा एखाद्या भव्य निसर्गचित्राचाही उपयोग करता येऊ शकतो. मोठय़ा आकाराच्या आरशामुळे छोट्या आकाराच्या खोलीलाही भव्यता मिळू शकते. घरात छोटी, मोठी झाडं ठेवल्यास मनाला आल्हाददायक वाटतं. कुंडीतील छोटी रोपंही मनाला आकर्षून घेतात.

-वैष्णवी कुलकर्णी

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

सणासुदीत मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडलंय? ‘हे’ घरगुती उपाय देतील झटपट आराम

ही योगासने आणि शितकारी प्राणायाम मेनोपॉजच्या काळात फायदेशीर आहे

Janmashtami Essay 2026 जन्माष्टमी निबंध

अतिशय चवदार आणि चमचमीत भाजी ''कढाई मशरूम'' पराठ्यासोबत अप्रतिम लागते

रोज रात्री उशिरा जेवता? डॉक्टरांचा हा महत्त्वाचा सल्ला दुर्लक्षित करू नका

पुढील लेख
Show comments